Jacqueline Fernandez’s New Song Dum Dum Release: बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी ती ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. सिनेमातील तिच्या भूमिकेचे कौतुकदेखील होताना दिसत आहे.
आता अभिनेत्री चित्रपटामुळे नाही तर तिच्या नवीन म्युझिक व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. नुकतेच तिचे ‘दम दम’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. टी-सीरीज निर्मित हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यातील तिचा लूक आणि डान्स स्टेप्स नजर खिळवून ठेवत आहेत. हे गाणे असीस कौरने गायले आहे आणि जानीने गाण्याचे बोल लिहिले आहेत.
जॅकलिनचे ‘दम दम’ हे गाणे रिलीज होऊन काही तासच झाले आहेत. सोशल मीडियावर हे गाणे व्हायरल होत असून जॅकलीनने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओला आतापर्यंत दोन मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. तर युट्यूबवर ‘दम दम’ या या गाण्याला चार मिलियनहून अधिक व्हूज मिळाले आहेत.
प्रेक्षक जॅकलीनचे मोठे कौतुक करत असल्याचे कमेंट्सवरुन पाहायला मिळत आहेत. तसेच असीस कौर अशा पद्धतीचे गाणे गाईल असे वाटले नव्हते, असेही काहींनी म्हटले आहे. चाहते जॅकलीनच्या नवीन गाण्याबाबत काय म्हणालेत? चला जाणून घेऊयात…
नेटकरी काय म्हणाले?
एका नेटकऱ्याने लिहिले, “तिचे हावभाव खूप छान आहेत. ती खूप सुंदर डान्स करत आहे.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “जॅकलीनचे डान्स मुव्ह्ज आणि तिच्या हावभाव अतुलनीय आहेत”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “जॅकलीनसाठी हे वर्ष खूप छान आहे.”



“गाणं चांगलं नाहीये पण जॅकलिनचा अभिनय, मेकअप, डान्स खूपच छान आहे”, “असीस कौर अशा पद्धतीचे गाणे गाईल हे मला अपेक्षित नव्हते. माझ्यासाठी हे सरप्राइज आहे”, “ती इतके उत्तम डान्स मुव्ह्ज करत आहे की नजर तिच्यावर खिळली आहे”, “जॅकलिनला सलाम”, “एकामागून एक हिट गाणी”, “या गाण्यातील जॅकलीनचा डान्स आपण १००० पेक्षा जास्त वेळा पाहू शकतो”, अशा अनेक कमेंट करीत प्रेक्षकांनी तिचे कौतुक केले आहे.


जॅकलीन तिच्या डान्ससाठी लोकप्रिय होते. जॅकलीन ज्या गाण्यात दिसते, ते गाणे हिट होते, असेही अनेकदा म्हटले जाते. आता जॅकलीनचे हे नवीन गाणेदेखील धुमाकूळ घालताना दिसत आहे.
कामाच्या बाबतीत बोलायचे तर ती नुकतीच हाऊसफुल ५ मध्ये दिसली. या चित्रपटात तिच्याबरोबरच नर्गिस फाखरी, अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, श्रेयस तळपदे, नाना पाटेकर असे अनेक कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता अभिनेत्री आगामी काळात कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.