Janhvi Kapoor Roohi Movie OTT : भारतीय सिनेमाच्या इतिहासात असे अनेक चित्रपट बनले आहेत, जे बॉक्स ऑफिसवर चालले नाहीत. पण, त्यातील गाणी मात्र कायम प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली. अशा चित्रपटातील गाण्यांचे साऊंड ट्रॅक आणि ती गाणी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये लावली जातात. असंच काहीसं घडलेलं ६ वर्षांपूर्वी आलेल्या एका हॉरर चित्रपटाबरोबर.
बॉलीवूडमध्ये आतापर्यंत अनेक हॉरर चित्रपट बनले आहेत. काही चित्रपट तर लोकांनी इतक्या वेळा पाहिले आहेत की, त्यातील सीन, गाणी व संवाद त्यांना तोंडपाठ असतात. हॉरर चित्रपटांचा एक वेगळा चाहतावर्ग असतो. जो वेगवेगळे हॉरर चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असतो, जर तुम्हालासुद्धा हॉरर चित्रपट पाहण्याची आवड असेल, तर आम्ही तुम्हाला अशाच एका बॉलीवूडमधील हॉरर चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. खरं तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई करू शकला नाही; पण यामध्ये चांगली स्टारकास्ट आहे. हा मोठं बजेट असलेला चित्रपट आहे. त्याशिवाय चित्रपटाची कथासुद्धा रंजक आहे.
‘रुही’ हा हॉरर चित्रपट पाहिलात का?
कोविडच्या काळात चित्रपटांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे काही बिग बजेट चित्रपटांचं नुकसान झालं. त्यापैकीच एक म्हणजे जान्हवी कपूर व राजकुमार राव यांचा ‘रुही’ हा हॉरर चित्रपट. दिनेश विजेस आणि मॅडडॉकची निर्मिती असलेल्या हा चित्रपट २० कोटींमध्ये बनला होता. परंतु, २०२१ मध्ये कोविडच्या काळात प्रदर्शित झाल्यानं चित्रपटाबद्दल संम्रिश्र प्रतिक्रियाही आल्या होत्या आणि बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. त्यामुळे हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. परंतु, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच त्यातील गाणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. सचिन-जिगर यांनी चित्रपटाची गाणी संगीतबद्ध केली होती; तर अमिताभ भट्टाचार्य यांनी या गीतांचे लेखन केले होते.
हार्दिक मेहता दिग्दर्शित ‘रुही’ या चित्रपटात जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत होती. तिच्यासह या चित्रपटात राजकुमार राव, वरुण शर्मा महत्त्वपूर्ण भूमिकांत झळकले होते. जान्हवीने यामध्ये रुही व अफझा या दुहेरी भूमिका साकारल्या. या चित्रपटातील गाण्यासाठी जान्हवीनं डान्स रिहर्सलही केल्याचं तिनं म्हटलेलं. २३ फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील गाण्यांना यूट्यूबवर लाखोमध्ये व्ह्युज आले होते.
‘रुही’ चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झालं, तर चित्रपटात दोन छोट्याशा गावांतून आलेल्या पुरुषांना एका वधूचं अपहरण करण्याचं काम दिलं जातं. परंतु, त्यांना लवकरच कळतं की, त्या वधूमध्ये एका आत्म्याचा वास आहे. परंतु, जेव्हा या दोघांमधील एक जण तिच्या प्रेमात पडतो तेव्हा कथेत वेगळाच ट्वीस्ट येतो. यावेळी दुसरा माणूस मात्र महिलेतील आत्म्याच्या मागे असतो.
२० कोटींचं बजेट असलेला हा चित्रपट ११ मार्च २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला. या चित्रपटानं जगभरात ३१ कोटींचं कलेक्शन केलं होतं. पहिल्या दिवशी या हॉरर कॉमेडी चित्रपटानं २.७३ कोटींचा गल्ला जमवलेला. परंतु, त्यानंतर चांगला प्रतिसाद न मिळाल्यानं चित्रपट फ्लॉप ठऱला. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
