Janhvi Kapoor and Orhan Awatramani Are Not Dating Each Other says common friend | Loksatta

“दोघं एकमेकांना…” जान्हवी कपूर आणि ओरहान अवत्रामणीच्या नात्याबद्दल जवळच्या व्यक्तीचा खुलासा

गेल्या अनेक दिवसांपासून आहे जान्हवी कपूर अन् ओहरानच्या रिलेशनशिपची चर्चा, पण नात्यात नेमकं सत्य काय?

“दोघं एकमेकांना…” जान्हवी कपूर आणि ओरहान अवत्रामणीच्या नात्याबद्दल जवळच्या व्यक्तीचा खुलासा
(फोटो – इन्स्टाग्रामवरून साभार)

मागच्या अनेक दिवसांपासून जान्हवी कपूर ओरहान अवत्रामणीला डेट करत असल्याची चर्चा आहे. ओरहान अवत्रामणी हा चित्रपटांमध्ये दिसत नसला तरी तो बहुतेक सर्वच बॉलिवूड पार्ट्यांना उपस्थित राहतो. न्यासा देवगनपासून ते सारा अली खानपर्यंत सर्व स्टार किड्ससोबत ओरहानची जबरदस्त बाँडिंग पाहायला मिळते. ओरहान आणि जान्हवी कपूर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चाही जोरात सुरू आहेत. पण आता नुकताच या दोघांच्या नात्याबद्दल एक मोठा खुलासा झाला आहे.

‘इटाईम्स’च्या रिपोर्टनुसार, जान्हवी आणि ओरहानच्या कॉमन फ्रेंडने खुलासा केला आहे की दोघं एकमेकांना कधीच डेट करत नव्हते, तसेच त्यांचं एकमेकांवर कधीच प्रेमही नव्हतं. “त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल कधीही रोमँटिक फीलिंग नव्हती. ओरहान आणि जान्हवी दोघेही एकमेकांपासून खूप वेगळे आहेत. ते एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. पण त्यांच्यात यापेक्षा जास्त काहीच नाही.

“तुला बाहेर काढलं…” तेजस्विनी लोणारीच्या एक्झिटवर बिग बॉसच्या स्पर्धकाची प्रतिक्रिया

यापूर्वीही जान्हवीने तिच्या एका मुलाखतीत ओरहानबद्दल सांगितलं होतं. ओरहानबद्दल विचारलं असता, जान्हवी म्हणाली होती, “मी ओरहानला अनेक वर्षांपासून ओळखते, तो एक प्रकारे माझी सपोर्ट सिस्टीम आहे, जेव्हा तो आजूबाजूला असतो तेव्हा मला घरी असल्यासारखं वाटतं आणि माझा त्याच्यावर खूप विश्वास आहे. या काळात तुमच्यासाठी उभे राहणारे मित्र मिळणं फार कठीण आहे. जेव्हा आम्ही एकत्र असतो, तेव्हा आम्ही खूप मजा करतो. तो खूप छान आहे.”

रुबिना दिलैक देणार गुड न्यूज ? खुलासा करत म्हणाली, “मी आणि अभिनव आता…”

दरम्यान, यावर्षी ऑगस्ट महिन्यात जान्हवी कपूर तिचा कथित बॉयफ्रेंड ओरहान अवत्रामणीसोबत पार्टी करताना रेस्टॉरंटच्या बाहेर दिसली होती. त्यावेळी ती रागात रेस्टॉरंटबाहेर पडली होती, त्यानंतर तिच्या आणि ओरहानच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं होतं. 

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 17:02 IST
Next Story
“घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय कारण…” नीना गुप्ता यांनी मांडलं भारतीय लग्नसंस्थेबद्दल मत