अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर बॉलीवू़डमधील लोकप्रिय कलाकार आहेत. २०२३ च्या ‘बवाल’ चित्रपटानंतर वरुण धवन आणि जान्हवी कपूरची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. धर्मा प्रोडक्शनच्या ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’या आगामी चित्रपटाद्वारे दोघेही प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येणार आहेत. या प्रेमकथेची निर्मिती करण जोहर करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२२ फेब्रुवारीला धर्मा प्रोडक्शनच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या आगामी चित्रपटाची घोषणा जाहीर झाली. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान करणार आहे. ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ आणि ‘धडक’ यासह त्याने वरुण धवन आणि जान्हवी कपूरचे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

हेही वाचा… फक्त ९९ रुपयांमध्ये पाहता येणार तुमच्या आवडीचा चित्रपट; ‘सिनेमा लव्हर्स डे’च्या निमित्ताने आहे खास ऑफर

या चित्रपटाच्या घोषणेची पोस्ट शेअर करत त्यात कॅप्शन लिहिले होते की, “तुमचा ‘सनी संस्कारी’ ‘तुलसी कुमारी’ला मिळवण्याच्या मार्गावर आहे! मनोरंजनाने गुंफलेली ही प्रेमकथा मोठ्या पडद्यावर लवकरच येत आहे!”

‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ १५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात वरुण ‘सनी संस्कारी’ची मुख्य भूमिका साकारणार आहे तर जान्हवी ‘तुलसी कुमारी’ची भूमिका साकारणार आहे. याची निर्मिती करण जोहर, हिरू यश जोहर, अपूर्व मेहता आणि शशांक खेतान यांनी केली आहे.

हेही वाचा… ट्विंकल खन्नाच्या ‘त्या’ विधानावर कंगना रणौतचे खडेबोल; म्हणाली, “पुरुषांना प्लास्टिकची बॅग…”

दरम्यान वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांनी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बवाल’ या चित्रपटासाठी पहिल्यांदा एकत्रित काम केले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Janhvi kapoor and varun dhawan new movie sunny sanskari ki tulsi kumari announcement by dharma productions and karan johar dvr
First published on: 22-02-2024 at 19:40 IST