Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding: देशाचे सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानींचे छोटे सुपुत्र अनंत अंबानीचा प्री-वेडिंगचा कार्यक्रम मोठ्या धुमधडाक्यात गुजरातमधील जामनगर येथे होतं आहे. हॉलीवूडपासून बॉलीवूडपर्यंतच्या कलाकार मंडळींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. १ मार्चपासून सुरू झालेल्या या प्री-वेडिंगच्या कार्यक्रमाचा आज शेवटचा दिवस आहे. काल, दुसऱ्या दिवशी संगीत सोहळा पार पडला. ज्यामध्ये बॉलीवूडच्या सेलिब्रिटींचा जबरदस्त डान्स पाहायला मिळाला. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

अनंत-राधिका यांच्या संगीत सोहळ्यात काल बऱ्याच काळानंतर तीन खान एकत्र पाहायला मिळाले. सलमान खान, शाहरुख खान आणि आमिन खान यांनी RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्यावर डान्स केला. तसेच बॉलीवूडच्या तारका प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रासह थिरकताना दिसल्या.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची बायको आहे डॉक्टर, सुरू केलं स्वतःचं ठाण्यात पहिलं क्लिनिक

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘मानव मंगलानी’ या इन्स्टाग्रामवर पेजवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओत, अभिनेत्री अनन्या पांडे, सारा अली खान, खुशी कपूर, जान्हवी कपूर आणि मनीष मल्होत्रा डान्स करताना पाहायला मिळत आहे. करण जोहरच्या ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील ‘बोले चुडिया’ या गाण्यावर हे कलाकार डान्स करत आहेत. या पाच जणांच्या या डान्स व्हिडीओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – Video: ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीला उखाणा घेताना दाटून आला कंठ, पाहा साखरपुड्याचा सुंदर व्हिडीओ

दरम्यान, अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचा आज शेवटचा दिवस आहे. आज ‘टस्कर ट्रेल्स’ आणि ‘हस्ताक्षर’ हा कार्यक्रम आहे. ‘टस्कर ट्रेल्स’ हा आउटडोअर कार्यक्रम असून यात पाहुण्यांना जामनगर फिरवलं जाणार आहे. तर दुसरा कार्यक्रम भारतीय पेहरावात असणार आहे.