Janhvi Kapoor Luxury Watch Price : बॉलीवूडचे दिग्दर्शक बोनी कपूर यांची मुलगी अंशुला कपूर हिचा विवाह सोहळा पार पडला आहे. कपूर घराण्यामध्ये पार पडलेल्या या लग्नाची सिनेविश्वामध्ये चर्चा आहे. अंशुलासह सोनम कपूर, खुशी कपूर आणि जान्हवी कपूर यांच्या स्टाईलिंगची जोरदार चर्चा आहे. बहिणीच्या लग्नामध्ये जान्हवीने खास लक्झरी घड्याळ स्टाईल केले होते. डायमंडने घडवलेल्या या घड्याळाची किंमत वाचून सर्वजण थक्क झाले आहेत.
अंशुला कपूरच्या लग्नापूर्वी पार पडलेल्या विधींमध्ये खुशी कपूर व जान्हवी कपूर सहभागी झाल्या होत्या. यावेळी जान्हवीने पेस्टल रंगाच्या आऊटफिटमध्ये सर्वांचे लक्ष वेधले. ऑफ शोल्डर स्टाईलमध्ये जान्हवीने वनपीस परिधान केला होता. पारंपरिक लूक असणाऱ्या या गाऊनला खास वेस्टर्न टच होता. पिच रंगाच्या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य आणखी खुलले होते. यावर तिने फक्त मोठे झुमके आणि एक घड्याळ स्टाईल केले होते. मात्र, या एका घड्याळाची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. जान्हवी कपूरच्या या घड्याळाला खरे हिरे जडवण्यात आले होते.
तिने ‘पॅटेक फिलिप गोंडोलो हॉट क्लेअर पर्ल’ हे लक्झरी घड्याळ परिधान केले होते. रोज गोल्ड रंगामध्ये असलेल्या घड्याळावर नाजूक हिरे लावण्यात आले असून उत्कृष्ट कोरीव काम करण्यात आले आहे. हे घड्याळ तिच्या रॉयल लूकमध्ये अधिकच भर घालत होते. टाइम्स एंटरटेनमेंटच्या वृत्तानुसार, या घड्याळाची किंमत तब्बल २.५ कोटी रुपये आहे. आर्ट डेको शैलीपासून प्रेरित असलेल्या या विंटेज डिझाइनमध्ये उत्कृष्ट स्विस कारागिरीची झलक पाहायला मिळते. विशेष म्हणजे, हे हँडमेड घड्याळ असून ते मॅन्युअल-वाइंड मूव्हमेंटवर चालते.
या घड्याळाची रचनादेखील खूप खास आहे. वृत्तांनुसार, त्याच्या डायलवर २५१ खरे हिरे जडवण्यात आले आहेत. तसेच घड्याळाच्या बेल्टवर ७९ अकोया मोती आणि प्रिन्सेस-कट हिरे लावण्यात आले आहेत. याशिवाय, १८ कॅरेट सोन्याच्या डायलवरही हिऱ्यांची सुंदर जडणघडण करण्यात आली आहे. घड्याळाची आकर्षक रचना आणि सुबक कारागिरी यामुळेच या घड्याळाची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. जान्हवी कपूरच्या या घड्याळाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
अंशूला कपूरचा शाही थाटात विवाहसोहळा पार
अंशूला कपूर व रोहन ठक्कर यांचे लग्न मुंबईतील ‘ताज लँड्स एंड’ इथे पार पडले. या विवाह सोहळ्याला कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र-मैत्रिणींची उपस्थिती होती. यावेळी नववधू अंशूला कपूरने गुलाबी आणि सोनेरी रंगाचा भरजरी लेहेंगा परिधान केला होता. तिने तिच्या आईची ४२ वर्षे जुनी भरजरी ओढणी घेतली होती. त्याचबरोबर बहिणीच्या लग्नात करवली असलेल्या जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांच्या ग्लॅमरस लूकनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
