Janhvi Kapoor : जान्हवी कपूर आपल्या अभिनयाबरोबर स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती शिखर पहारियाला डेट करतेय. ती त्याच्याबरोबरचे अनेक फोटो शेअर करत असते. ते दोघे कधी डेटवर तर कधी मंदिरात एकत्र दिसतात. मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नातही जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया एकत्र पोहोचले होते. जान्हवी अनेकदा शिखरचे कौतुक करताना दिसते.

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवीने सांगितले की, ती मासिक पाळीदरम्यान ती शिखरबरोबर ब्रेकअप करत असे. तिने या मुलाखतीत मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या त्रासाचाही उल्लेख केला. जान्हवी कपूरने ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या एका हार्टब्रेकचा अनुभव सांगितला आणि त्यावेळी तिचा बॉयफ्रेंड शिखर पहारियाने तिला कसे सावरले, याबाबतही तिने सांगितले. ती म्हणाली, “आयुष्यात माझा फक्त एकदाच प्रेमभंग झाला होता, पण त्याच व्यक्तीने पुन्हा माझी मनधरणी केली. सुरुवातीच्या काही वर्षांत, मासिक पाळीच्या पहिल्या २-३ दिवसांत मी शिखरबरोबर ब्रेकअप करत असे. सुरुवातीचे काही महिने तो खूप हैराण झाला; पण नंतर तोही समजून गेला. ब्रेकअपनंतर दोन दिवसांनी मी रडत रडत त्याला ‘सॉरी’ म्हणायचे.”

r madhvan sarita 25 years of marriage 1
कोल्हापूरच्या मराठमोळ्या सरिताच्या प्रेमात पडलेला आर माधवन! सांगितलं २५ वर्षांच्या वैवाहिक आयुष्याचं गुपित, म्हणाला…
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
reshma shinde wedding share dreamy photos of marriage
साता जन्माचे सोबती! रेश्मा शिंदे दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; फोटो शेअर करत म्हणाली, “आयुष्याची…”
kalki koechlin struggle in bollywood
पहिल्या सिनेमानंतर ‘या’ अभिनेत्रीकडे नव्हतं दोन वर्षं काम, वडापाववर काढले दिवस; लोकल ट्रेनने केला प्रवास, खुलासा करत म्हणाली…
madhuri dixit mumbai home inside photos
माधुरी दीक्षितचं मुंबईतील घर आतून कसं दिसतं? पाहा ५३ व्या मजल्यावरील अपार्टमेंटचा Inside Video
“त्या दिग्दर्शकाने मला ऑफिसमध्ये बोलावलं आणि…”, राजकुमार रावच्या पत्नीने सांगितला ‘तो’ अनुभव
Shreya Ghoshal and ganesh acharya dance on sooseki song of pushpa 2 movie
Video: ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘सूसेकी’ गाण्यावर श्रेया घोषाल आणि गणेश आचार्य यांचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

हेही वाचा…जान्हवी की खुशी सावत्र बहि‍णींपैकी अर्जुनच्या जवळची कोण? अभिनेता म्हणाला, “माझ्या आयुष्यात…”

मासिक पाळीदरम्यान जान्हवी कपूरच्या नाकातून आले होते रक्त

एका मुलाखतीत जान्हवीने सांगितले होते की, पाळी आल्यावर वेळी तिला प्रचंड वेदना होतात. अंग दुखतं आणि कंबरही दुखते, असं जान्हवी म्हणाली. जान्हवीने सांगितले की ती कधी कधी कामात इतकी व्यग्र असते की मासिक पाळीच्या वेदना विसरून जाते. एकदा मासिक पाळीदरम्यान तिच्या नाकातून रक्त आले होते असे तिने एका मुलाखतीत नमूद केले आहे.

हेही वाचा…पहिल्या सिनेमानंतर ‘या’ अभिनेत्रीकडे नव्हतं दोन वर्षं काम, वडापाववर काढले दिवस; लोकल ट्रेनने केला प्रवास, खुलासा करत म्हणाली…

शिखर पहारिया कोण आहे?

जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहारिया (Shikhar Pahariya) व्यवसायिक असून तो एक प्रोफेशनल पोलो खेळाडू देखील आहे. शिखरने बॉम्बे स्कॉटिश आणि धीरूभाई अंबानी स्कूलमधून शिक्षण घेतले असून, त्यानंतर लंडनच्या रीजेंट युनिव्हर्सिटीमधून ग्लोबल फायनान्शिअल मॅनेजमेंटमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. लंडनमधील वधावन ग्लोबल कॅपिटल येथे शिखरने इन्व्हेस्टमेंट अॅनालिस्ट म्हणून काम केले आहे. २०१८ साली शिखरने एंटरटेनमेंट आणि गेमिंगचा व्यवसाय सुरू केला. शिखर आणि जान्हवी एकाच शाळेत शिकले असून दोघेही बालपणीचे मित्र आहेत.