बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर शिखर पहारियाबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा मागच्या अनेक महिन्यांपासून होत आहे. दोघेही आधी रिलेशनशिपमध्ये होते पण नंतर त्यांचं ब्रेक अप झालं होतं, अशी माहिती मीडिया रिपोर्ट्समध्ये होते. पण गेल्या काही महिन्यात जान्हवी आणि शिखर अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसले होते.
जान्हवी कपूर पुन्हा एकदा एक्स बॉयफ्रेंड शिखरला डेट करत असल्याचं म्हटलं जातंय. अशातच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती वडील बोनी कपूर व शिखर या दोन्हींबरोबर दिसत आहे. ‘विरल भयानी’ नावाच्या एका पेजवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये जान्हवीबरोबर बोनी कपूर व शिखर दोघेही दिसत आहेत. त्यामुळे हे सर्वजण एकत्र फिरायला गेल्याची चर्चा आहे.
मुंबई विमानतळावर हे तिघेही स्पॉट झाले. आधी जान्हवी, नंतर बोनी कपूर व त्यांच्या पाठोपाठ शिखर दिसला. त्यामुळे जान्हवी शिखरला डेट करत असल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान, जान्हवी कपूर आणि शिखर २०१६ मध्ये एकमेकांना डेट करत होते. पण, श्रीदेवींच्या ‘नो डेटींग क्लॉज’मुळे या दोघांना तेव्हा वेगळं व्हावं लागलं होतं. पण, आता बोनी कपूर यांच्याबरोबरच शिखर दिसल्याने दोघे पुन्हा एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होत आहे.