दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज ६१वा जयंती आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते श्रीदेवींच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना अभिवादन केलं जात आहे. लेक जान्हवी कपूरने आईच्या जयंतीनिमित्ताने तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. यावेळी बॉयफ्रेंड शिखर पहारिया जान्हवीबरोबर पाहायला मिळाला. तिरुपती मंदिराबाहेरील दोघांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. 'पीटीआय' या वृत्तसंस्थेने जान्हवी कपूर व शिखर पहारियाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी व शिखर एकत्र नतमस्तक होऊन तिरुपती बालजीचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत. यावेळी हिरव्या रंगाच्या ब्लाउजवर सुंदर अशी पिवळ्या रंगाची साडी जान्हवीने नेसली होती. तर शिखर लुंगीमध्ये पाहायला मिळाला. दोघांच्या या दाक्षिणात्य लूकने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हेही वाचा - “खड्डे भेदभाव करत नाहीत”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्याचा व्हिडीओ शेअर करत विवेक अग्निहोत्रींचे विधान, म्हणाले… VIDEO | Actress Janhvi Kapoor (@JanhviKappor) visited Tirupati Balaji Temple in Tirumala, Andhra Pradesh, earlier today.(Full video available on PTI Videos - ) pic.twitter.com/15tA3uY05s— Press Trust of India (@PTI_News) August 13, 2024 याशिवाय जान्हवीने सोशल मीडियावर आईच्या जयंतीनिमित्ताने खास पोस्ट देखील शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिरुपतीचे आणि आईबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये एका मंदिराच्या पायऱ्या दिसत आहे. तर दुसरा फोटो जान्हवीच्या बालपणीचा आहे. या फोटोमध्ये जान्हवी आई श्रीदेवीबरोबर दिसत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये तिरुपती बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर पोज देताना जान्हवी पाहायला मिळत आहे. हे तीन फोटो शेअर करत जान्हवीने लिहिलं आहे, "वाढदिवसाच्या शुभेच्छा मम्मा. खूप सारं प्रेम." हेही वाचा – सलमान खानच्या हिंदी ‘बिग बॉस’मध्ये ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्री झळकणार? निर्मात्यांकडून विचारणा झाल्याचं आलं समोर दरम्यान, जान्हवी कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिचा बहुचर्चित ‘देवरा: पार्ट १’ चित्रपट २७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून जान्हवी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. ‘देवरा: पार्ट १’ चित्रपटात जान्हवी कपूर ज्युनियर एनटीआर, सैफ अली खान, श्रुती मराठे, प्रकाश राज, श्रीकांत, शाइन टॉम चाको आणि नारायण झळकणार आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील ‘धीरे-धीरे’ गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्यातील जान्हवी व ज्युनियर एनटीआरची केमिस्ट्री पाहून अनेकजण थक्क झाले होते.