मनोरंजन विश्वात नाव, प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर पोहोचण्याचे स्वप्न प्रत्येक कलाकार पाहतो. मात्र हे सगळं हातात असूनही एका अभिनेत्याने यशाच्या शिखरावर असताना विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी हे सगळं सोडलं. होय. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण ओडोमोस, डेटॉलपासून ते एव्हररेडी आणि मास्टरशेफपर्यंतच्या अनेक जाहिरातींमध्ये झळकलेला अभिनेता जस खेतानीने अभिनय सोडला. १०० हून जास्त जाहिराती त्याने केल्या. एमएस धोनी, अक्षय कुमारबरोबर स्क्रीन शेअर केली. त्याने हृतिक रोशनच्या काबिल सिनेमातही काम केलं होतं. अभिनयातील करिअरला गती मिळत असताना त्याने एक मोठा निर्णय घेतला. त्याने इंडस्ट्री सोडून क्वांटम फिजिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग समजून घेण्यासाठी अभिनयाला रामराम ठोकला.

जस खेतानी सध्या काय करतोय?

जस खेतानी सध्या न्यू जर्सीच्या फेअरली डिकिन्सन युनिव्हर्सिटीमध्ये कॉम्प्युटर सायन्समध्ये बॅचलर ऑफ सायन्स करतोय. गणित हा त्याचा मायनर विषय आहे. ‘जस ऑटोमेशन सोल्यूशन्स’चा तो संस्थापक आहे. तसेच तो युनिव्हर्सिटीमध्ये अंडरग्रॅजुएट टेक असिस्टंट म्हणून काम करतोय. त्यात त्याने पायथन आणि मशिन लर्निंगचा वापर करून ह्युमनॉइड रोबोट्स अपग्रेड केले आहेत. त्याचबरोबर ‘टेलिकॉम सिस्टीम इंटिग्रेटर’मध्ये इंटर्नशिप करताना एजाइल पद्धतींचा वापर करून पायथन-आधारित कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सॉफ्टवेअर विकसित केले. हे सगळं त्याने वयाच्या अवघ्या विशीत केलंय.

jas-khetani-left-acting-for-quantum-physics-and-ai
अभिनेता जस खेतानी, जाहिरातील फोटो आणि आताचा फोटो (सौजन्य- इन्स्टाग्राम व लिंक्डइन)

जस खेतानीचे छंद

जस खेतानी याला क्वांटम कॉम्प्युटिंग, ब्लॉकचेन, रोबोटिक्स आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची प्रचंड आवड आहे. विज्ञान हा त्याचा आवडता विषय असला तरी तो त्याचे इतर छंदही जोपासतो. जस ‘ऐ हालो’चा संस्थापक आहे. त्याला गरबा करायला आवडतं. इतकंच नाही तर बासरी वाजवण्यापासून ते मार्शल आर्ट्स आणि फायर स्टिक्सने प्रयोग करण्यापर्यंत तो अनेक गोष्ट करतो. तो ‘रासलीला गरबा अकॅडमी’त जगभरातील विद्यार्थ्यांना गरबा शिकवतो.

jas-khetani-left-acting-for-quantum-physics-and-ai
जस खेतानी बासरी वाजवताना (फोटो- इन्स्टाग्राम)

मे महिन्यात जस याच्या वाढदिवसानिमित्त त्याची बहीण काव्यांशी सिमारियाने एक पोस्ट केली होती. “१०० पेक्षा जास्त जाहिराती, चित्रपट, ज्याची लोक स्वप्न पाहतात असं करिअर त्याने करिअरच्या शिखरावर असताना सोडलं.”

jas-khetani-left-acting-for-quantum-physics-and-ai(1)
एका जाहिरातीत जस खेतानी व सारा अर्जुन (फोटो- स्क्रीनशॉट)

अवघ्या ११ व्या जसने पाठ केलेलं पूर्ण पुस्तक

जस याला आव्हानं स्वीकारण्याची आवड बालपणापासूनच आहे. २०१७ मध्ये, सहावीत असताना त्याने प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतला होता. तिथे त्याने पृष्ठ क्रमांकांसह पूर्ण पुस्तक पाठ करण्याचं आव्हान स्वीकारलं होतं आणि ते यशस्वीपणे पूर्ण केलं होतं. तो या कार्यक्रमातील सर्वात कमी वयाचा स्पर्धक होता.

टीव्ही जाहिराती आणि बॉलीवूडपासून ते क्वांटम कॉम्प्युटिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत, जस खेतानीचा प्रवास ‘यश फक्त एकाच मार्गाने मिळते’ असा समज खोडून काढतो. अनेक नवोदित कलाकारांचं यशस्वी होण्याचं जे स्वप्न असतं, ते पूर्ण होऊनही जस खेतानीने पूर्ण वेगळ्या क्षेत्रात स्वतःला झोकून दिलं आणि अभिनयाचप्रमाणेच तिकडेही तो कमाल काम करतोय.