प्रसिद्ध कवी, लेखक जावेद अख्तर त्यांच्या परखड मतांमुळे नेहमी चर्चेत असतात. आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींविषयी ते सतत भाष्य करतात. यावेळी अनेकदा ते ट्रोलही होतात. पण ट्रोलर्सना देखील जावेद अख्तर सडेतोड उत्तर देताना पाहायला मिळतात. अलीकडेच त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीबद्दल एक्सवर पोस्ट केली होती. ज्यानंतर त्यांना काही युजर्सनी ट्रोल केलं. यातील एका युजरने त्यांना थेट ‘गद्दाराचे पुत्र’ म्हटलं. यामुळे जावेद अख्तर भडकले आणि त्यांनी त्या युजरला चांगलंच उत्तर दिलं.

जावेद अख्तर यांनी ६ जूनला ‘एक्स’वर एक पोस्ट लिहिली होती. त्यांनी त्यात लिहिलं होतं की, “मी भारतीय नागरिक असल्याचा मला अभिमान आहे आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत असाच राहीन. पण माझ्यात आणि जो बायडेन यांच्यात सारखी गोष्ट आहे. आम्हा दोघांना अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष बनण्याची सारखीच संधी आहे.”

human personality mask
जिंकावे नि जगावेही: मुखवट्यांच्या आड
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Loksatta ulta chashma
उलटा चष्मा: बैलबुद्धी? नंदीबैल?
parental challenges, children s independence, generational tensions, family dynamics, emotional support, parent child relationship,
सांधा बदलताना : कळा ज्या लागल्या जीवा
Amol mitkari jaydeep apte 1
Amol Mitkari : “जयदीप आपटे याचा त्या पुतळ्याद्वारे छुपा अजेंडा…”, मिटकरींचे गंभीर आरोप; देवेंद्र फडणवीसांना म्हणाले…
Ambadas Mohite, Rakshabandhan, Maharashtra, abuse-free society, gender equality, respect for women,
रक्षाबंधनाला, मी कोणालाही आई-बहिणीवरून शिव्या देणार नाही, असे वचन…
Ajit Pawars reaction on family planning
अजित पवार असे का म्हणाले, देवाची, अल्लाहाची काही कृपा नसते…
Independence day 2024 | a daughter wrote a emotional letter to her martyred father
सलमान, अक्षयला हिरो मानणारी मी; मला कळलेच नाही की माझ्या घरात खरा हिरो होता ज्याने देशासाठी…; वाचा, एका लेकीचं शहीद वडिलांना लिहिलेलं पत्र

हेही वाचा – सलील कुलकर्णींनी हॉटेल व्यवसायात ठेवलं पाऊल, आईच्या हस्ते केलं उद्घाटन, पाहा फोटो

जावेद अख्तर यांच्या या पोस्टवर एका युजरने प्रतिक्रिया देत लिहिलं, “फक्त मुस्लिमांसाठी पाकिस्तान राष्ट्र बनवण्यात तुमच्या वडिलांची महत्त्वाची भूमिका होती. त्यानंतर त्यांनी एका पुरागामी लेखकाच्या वेषात भारतात राहणे पसंत केलं. तुम्ही एका गद्दाराचे पुत्र आहात, ज्यांनी धर्माच्या आधारावर आपल्या देशाची विभागणी केली. आता तुम्ही काहीही सांगा, पण हे सत्य आहे.”

या युजरच्या प्रतिक्रियेवर जावेद अख्तर यांनी सडेतोड उत्तर दिलं. त्यांनी लिहिलं की, “तुम्ही पूर्ण अज्ञानी आहात की पूर्ण मूर्ख आहात हे ठरवणं कठीण आहे. १९८७ पासून माझं कुटुंब स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्यात सामील असून त्यांना तुरुंगवास, काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागली आहे. तेव्हा कदाचित तुमचे पूर्वज ब्रिटीश सरकारचे जोडे चाटत होते.”

जावेद अख्तर यांच्या उत्तरानंतरही तो युजर शांत बसला नाही. त्याने पोस्ट करत लिहिलं, “मी जे काही बोललो ते पुराव्यांसह नाकारून फेक बातम्यांवर एफआयआर दाखल करा. मला तुरुंगात जाऊन आनंदच होईल मिस्टर जावेद अख्तर.”

हेही वाचा – “आई काळजी करू नको…”, लग्नाच्या १३ दिवसांनंतर सोनाक्षी सिन्हाला आली आईची आठवण, भावुक पोस्ट लिहित म्हणाली…

‘एक्स’वर जावेद अख्तर आणि युजरमधील झालेला हा वाद सध्या खूप चर्चेत आला आहे. दोघांच्याही या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.