scorecardresearch

Premium

जावेद अख्तर व त्यांच्या दोन्ही पत्नी, फरहान, त्याच्या दोन्ही पत्नी अन्…, अख्तर कुटुंबाचा फॅमिली फोटो व्हायरल

जावेद अख्तर, त्यांच्या दोन्ही पत्नी, फरहान, अधुना शिबानी अन्…, संपूर्ण अख्तर कुटुंब जेव्हा एकत्र येतं

farhan javed akhtar family photo
जावेद अख्तर यांचे संपूर्ण कुटुंब एकाच फोटोत (फोटो – फरहान अख्तर इन्स्टाग्राम)

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांचा मुलगा दिग्दर्शक व अभिनेता फरहान अख्तरच्या मुलीसाठी संपूर्ण कुटुंब एकत्र आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये जावेद अख्तर त्यांच्या दोन्ही पत्नी शबाना आझमी व हनी इराणी, फरहान अख्तर त्याची पूर्वाश्रमीची पत्नी अधुना आणि शिबानी दांडेकर तसेच त्याची मुलगी दिसत आहे. संपूर्ण कुटुंब फरहानची मोठी मुलगी शाक्य अख्तरच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीसाठी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.

प्रसिद्ध अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा, गर्लफ्रेंडने दिला बाळाला जन्म; फोटो पोस्ट करत म्हणाला…

genelia deshmukh gets surrounded with little kids on the street
Video : जिनिलीया त्यांच्याजवळ गेली अन्…; देशमुखांच्या सुनेच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष, सर्वत्र होतंय कौतुक
chandrasekhar bawankule target prithviraj chavan in akola
कराड : उदयनिधींच्या ‘त्या’ वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाणांनी भाष्य करावे; चंद्रशेखर बावनकुळे यांचे आव्हान 
missing grandfather handed over to relatives
नवी मुंबई : हरवलेले आजोबा जेष्ठ नागरिक दिनी कुटुंबीयात परतले; स्वच्छता मोहिमेतील स्वयंसेवकांची मोलाची मदत
Men Tie Rope Around Monkey’s Neck
अत्याचाराचा कळस! माकडाच्या गळ्यात दोरी बांधून जीव जाईपर्यंत नेलं फरपटत, VIRAL व्हिडीओ पाहताच संतापले लोक

अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तरची मोठी मुलगी शाक्य अख्तर यूकेच्या लँकेस्टर विद्यापीठातून ग्रॅज्युएट झाली आहे. लेकीचा अभिमान व्यक्त करत फरहान अख्तरने त्याच्या मुलीच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीतील काही फोटो आणि व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले. या फोटोत शाक्यचे आई-वडील व आजी आजोबा दिसत आहेत. तिच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीला पूर्ण अख्तर कुटुंबाने हजेरी लावली.

फरहानच्या या पोस्टवर करिश्मा कपूर, अर्जुन रामपाल, हृतिक रोशन, जोया अख्तर, अमृता अरोरा, सुझान खान यांनी कमेंट्स करून शाक्यचे अभिनंदन केले आहे. या ग्रॅज्युएशन सेरेमनीला फरहानची बहीण जोया आणि त्याची धाकटी मुलगी अकिरा उपस्थित राहु शकले नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Javed akhtar honey irani shabana azmi farhan akhtar adhuna shibani dandekar at daughter shakya graduation ceremony hrc

First published on: 21-07-2023 at 08:58 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×