प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर त्यांची गाणी, गझल याव्यतिरिक्त त्यांच्या सडेतोड वक्तव्यासाठीही ओळखले जातात. अनेक सामाजिक मुद्द्यांवर ते आपलं मत मांडताना दिसतात. जावेद अख्तर यांच्या जीवनावर ‘जादूनामा’ हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. जादू हे जावेद अख्तर यांचं बालपणीचं नाव आहे आणि त्यांच्या वडिलांनी स्वतःच्या एका कवितेतून हे नाव घेतलं होतं. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत जावेद अख्तर यांनी ‘मुस्लीम पर्सनल लॉ’वर भाष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जावेद अख्तर यांनी मुस्लीम पर्सनल लॉ चुकीचा असल्याचं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, “जर मुस्लीम पतींना ४ लग्न करण्याचा हक्क असेल तर मग महिलांनाही अशाचप्रकारे एकाच वेळी एकापेक्षा जास्त पती ठेवण्याचा हक्क असायला हवा. फक्त पतीने एकापेक्षा जास्त पत्नी ठेवल्याने पुरुष आणि महिलांमध्ये समानता होत नाही. एकाच वेळा एका पेक्षा जास्त लग्नं करणं हे देशाचा कायदा आणि संविधानाच्या नियमांच्या विरोधात आहे.”

आणखी वाचा- अमिताभ बच्चन यांच्यामुळे तुटली सलीम-जावेद यांची जोडी? वाचा त्यावेळी नेमकं काय घडलं

दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर म्हणाले, “कॉमन सिव्हिल कोडचा अर्थ फक्त असा नाही की सर्व समुदायातील लोकांसाठी एकच कायदा आहे. तर हा कायदा महिला आणि पुरुष यांच्यातही समानता असावी असं सांगतो. दोघांसाठीही समान मापदंड असायला हवेत. मी सुरुवातीपासूनच कॉमन सिव्हल कोडचं पालन करतो. ज्या व्यक्तीला महिला आणि पुरुष यांच्या समानतेची जाणीव आहे त्या प्रत्येक व्यक्तीने कॉमन सिव्हिल कोडचं पालन करायला हवं. माझ्या संपत्तीतही माझ्या मुलाएवढाच माझ्या मुलीचाही हक्क आहे.”

जावेद अख्तर पुढे म्हणाले, “आज आपल्या देशात समस्या ही आहे की, देशला सरकार मानलं जातंय आणि सरकारला देश मानलं जातंय. सरकार येत जात असतं पण देश तर कायम असतो. जर कोणी सरकारला विरोध केला तर त्याला देशद्रोही म्हटलं जातं. खरं तर असं व्हायला नको. देशाचा स्वभाव फार पूर्वीपासूनच लोकशाही हाच आहे. हजारो वर्षांपासून देशातील जनतेची मनस्थिती उदारमतवादी आहे. ते कधीच कट्टरतावादी नव्हते. आज ज्या प्रकारे धर्मांधतेला प्रोत्साहन दिले जात आहे, ती भारताची ओळख नाही आणि ते देशाच्या जनतेच्या स्वभावात किंवा विचारांतही नाही.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Javed akhtar open up on muslim personal law says women should have same rule for marriage mrj
First published on: 05-12-2022 at 13:24 IST