Javed Akhtar Shabana Azmi Sukoon House Video: बॉलीवूड सेलिब्रिटींची महागडी घरं कायम चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असतात. बऱ्याच कलाकारांची मुंबईत घरं आहेत. त्याचबरोबर लोणावळा, खंडाळा, अलिबाग या ठिकाणी फार्महाऊस आहेत. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर आणि त्यांची पत्नी, ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांचे मुंबईत आलिशान घर आहे. पण त्याचबरोबर खंडाळा येथे त्यांचे एक प्रशस्त फार्महाऊस आहे. फराह खानने तिच्या व्लॉगमध्ये जावेद अख्तर यांच्या या फार्महाऊसची झलक चाहत्यांना दाखवली.
जावेद अख्तर व शबाना आझमी खंडाळातील फार्महाऊसचे नाव ‘सुकून’ (Sukoon) असे आहे. नावाप्रमाणेच हे घर अत्यंत शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहे. जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनी हे घर सुमारे १५-२० वर्षांपूर्वी खरेदी केले होते. विशेष म्हणजे, या जागेवर असलेले १५० वर्षांचे वडाचे झाड पाहून त्यांनी ही जागा विकत घेण्याचा निर्णय घेतला होता.
चित्रपट निर्माती फराह खान हिने तिच्या यूट्यूब चॅनेलवर या घराचा ‘होम टूर’ व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामुळे या घराची आतील दृश्ये पहिल्यांदाच चाहत्यांना पाहायला मिळाली.
पाहा व्हिडीओ
या घराची रचना एखाद्या हेरिटेज हॉटेलसारखी वाटते. यात उंच लाकडी छत, विटांच्या भिंती आणि मोठे हॉल आहेत. घराचा मुख्य भाग एका मोठ्या ‘फायर’मध्ये (Foyer) उघडतो, जो खूप भव्य आहे. घरामध्ये शबाना आझमी यांनी जगभरातून गोळा केलेले अँटीक फर्निचर, कलाकृती आणि विंटेज वस्तू पाहायला मिळतात. भिंतींवर आणि कोपऱ्यांमध्ये विविध शिल्पे आणि सजावटीच्या वस्तू आहेत.
घराभोवती खूप खूप हिरवळ आणि एक मोठी बाग आहे. बागेत पांढऱ्या संगमरवरी मूर्ती आणि मध्यभागी एक सुंदर कारंजे आहे. या बागेतच फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचा विवाह सोहळा पार पडला होता. बागेत झाडांच्या खोडांपासून बनवलेले लाकडी बाक आहेत, जिथे बसून ते शांत वेळ घालवतात.
जावेद अख्तर यांनी त्यांच्या संघर्षाच्या काळात मुंबईत फूटपाथवरही दिवस काढले होते, त्यामुळे ‘सुकून’ हे खंडाळातील घर त्यांच्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे. जावेद अख्तर व शबाना मुंबईतून इथे वेळ घालवण्यासाठी येतात.

