Jawan Box Office Collection Day 11: सुपरस्टार शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचा सध्या बॉक्स ऑफिसवर जलवा पाहायला मिळत आहे. ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम रचत आहे. ‘जवान’चा दुसरा वीकेंडही ब्लॉकबस्टर राहिला. या चित्रपटाने देशभरात जबरदस्त कमाई केली आहे. इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’च्या मते, रविवारी चित्रपटाने अंदाजे ३६ कोटी रुपयांची कमाई केली.




चित्रपटाच्या दुसऱ्या रविवारच्या कलेक्शनसह, हिंदी, तमिळ आणि तेलुगुसह जवानचे ११ दिवसांचे एकूण कलेक्शन ४७७.२८ कोटी रुपये झाले आहे. जवान हा सर्वात जलद ४०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा बॉलीवूड चित्रपट ठरला. या चित्रपटाने देशातील एकूण कलेक्शनपैकी हिंदी भाषेत अंदाजे ४३० कोटी रुपये कमावले आहेत.
“तरुणपणी खूप उद्दाम होतं, म्हातारं झालं आणि लाचार…”, गश्मीर महाजनीची ‘ती’ पोस्ट चर्चेत
अॅटली दिग्दर्शित ‘जवान’ चित्रपट परदेशातही दमदार कमाई करत आहे. जवानने आतापर्यंत जगभरात तब्बल १०४ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स म्हणजेच ८६० कोटी रुपये कमावले आहेत, अशी माहितीही ‘सॅकनिल्क’ने दिली आहे. शाहरुख खान एका वर्षात १०० दशलक्ष डॉलर्स कमाई करणारे दोन चित्रपट देणारा पहिला एकमेव भारतीय कलाकार बनला आहे. यापूर्वी जानेवारीत रिलीज झालेल्या ‘पठाण’ने ही कामगिरी केली होती, त्यानंतर आता ‘जवान’ने केली आहे.
दीपिका पदुकोणने शाहरुख खानला किस करतानाचा फोटो केला शेअर, पती रणवीर सिंहच्या कमेंटने वेधलं लक्ष
दरम्यान, जवान चित्रपटात शाहरुख खानशिवाय प्रियामणी, नयनतारा, विजय सेतुपती, रिद्धी डोग्रा, सान्या मल्होत्रा, गिरीजा ओक हिच्यासह अनेक कलाकार आहेत. तसेच दीपिका पदुकोणनेही या चित्रपटात कॅमिओ केला आहे.