scorecardresearch

Premium

‘जवान’ने रचला नवा विक्रम! जगभरात पार केला १००० कोटींचा आकडा; तर, भारतात चित्रपटाने कमवले ‘इतके’ कोटी

‘जवान’ चित्रपट जगभरात १००० कोटी रुपये कमवण्यात यशस्वी ठरला आहे.

Jawan Movie
'जवान' बॉक्स ऑफिस कलेक्शन

शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘जवान’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने नवनवीन रेकॉर्ड निर्माण केले आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ७५ कोटींची कमाई केली होती. चित्रपट प्रदर्शन होऊन १८ दिवस झाले असतानाही अद्याप या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. अशातच चित्रपटाच्या १८ व्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

हेही वाचा- रोज दोन पाकिटे सिगारेट ओढणारा शाहिद कपूर ‘कबीर सिंग’च्या सेटवरून निघताना करायचा ‘ही’ गोष्ट; म्हणाला, “माझ्या बाळाला…”

mission-raniganj-box-office=day2
‘मिशन राणीगंज’च्या कमाईत अनपेक्षित वाढ; दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कमावले ‘इतके’ कोटी
mithun flop movie list
करिअरमध्ये तब्बल १८० फ्लॉप चित्रपट देऊनही ‘हा’ अभिनेता कसा बनला स्टार? एका वर्षी केलेले सलग ३३ फ्लॉप सिनेमे
Jawan Box Office Collection
‘जवान’ ५०० कोटीपासून थोडाच दूर, जगभरात कमावले तब्बल ‘इतके’ कोटी, शाहरुख खानने रचला नवा विक्रम
barbie
सुपरहिट ‘बार्बी’ आता घरबसल्या पाहता येणार! ‘या’ ओटीटी प्लेफॉर्मवर चित्रपट दाखल, पण…

सॅकनिल्क’च्या आकडेवारीनुसार प्रदर्शनाच्या १८ व्या दिवशी या चित्रपटाने १५.६९ कोटींची कमाई केली आहे. या कमाईला धरुन या चित्रपटाचे आत्तापर्यंतचे एकूण कलेक्शन ५६२ कोटी रुपये झाले आहे. चित्रपटाच्या कमाईचा वेग पाहता लवकरच हा चित्रपट भारतात ६०० कोटींचा आकडा पार करु शकतो. ‘जवान’ हा सर्वात जलद ५०० कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला आहे.

अ‍ॅटली दिग्दर्शित ‘जवान’ चित्रपट परदेशातही दमदार कमाई करत आहे. जवानने आतापर्यंत जगभरात १ हजार कोटींचा टप्पा पार केला आहे. हिंदीबरोबर तमिळ तेलगूमध्येही या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने ‘पठाण’ आणि ‘गदर २’ लाही मागे टाकले आहे. शाहरुखचाच चित्रपट पठाणला जगभरात १००० कोटी रुपये कमवण्यासाठी २६ दिवस लागले होते. मात्र जवानने अवघ्या १८ दिवसात जगभरात १००० कोटींचा व्यवसाय केला आहे.

हेही वाचा- परिणीती चोप्रा-राघव चड्ढांच्या लग्नाला गैरहजेरी, बहिणीच्या लग्नाच्या फोटोंवर कमेंट करत प्रियांका चोप्रा म्हणाली…

दरम्यान, ‘जवान’ चित्रपटात शाहरुख खानची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटात त्याचे पाच लूक पाहायला मिळतात. त्याशिवाय चित्रपटात नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, प्रियमणी, गिरीजा ओक, रिद्धी डोग्रा यांच्याही भूमिका आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jawan box office collection day 18 hah rukh khan film earns 1000 crore worldwide dpj

First published on: 25-09-2023 at 13:19 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×