शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. अ‍ॅटली दिग्दर्शित ‘जवान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड्स मोडत दमदार कमाई केली आहे. या चित्रपटात बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने महत्त्वाचा कॅमिओ केला आहे. दीपिकाने ‘जवान’मध्ये ऐश्वर्या राठोड ही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तिने साकारलेल्या भूमिकेविषयी दिग्दर्शक अ‍ॅटलीने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “कठोर निर्णय घ्यावे लागले”, अद्वैत दादरकरने सोडलं ‘झी मराठी’, पोस्ट शेअर करत म्हणाला, “धडपडलो, भांडलो…”

अ‍ॅटलीने सर्वप्रथम ऐश्वर्या राठोड या पात्राची स्क्रिप्ट लिहिली आणि त्यानंतर तो दीपिकाकडे कॅमिओसाठी विचारणा करायला गेला होता. स्क्रिप्ट ऐकल्यावर दीपिकाने ही भूमिका लहान असली तरीही फार मोठी आहे असं सांगत तात्काळ होकार कळवला. याबद्दल अ‍ॅटलीने अभिनेत्रीचे आभार मानले.

हेही वाचा : ‘आरआरआर’नंतर एसएस राजामौली यांनी दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकची केली घोषणा; काय असणार चित्रपटाचं नाव?

दीपिकाविषयी सांगताना अ‍ॅटली पुढे म्हणाला, “बॉलीवूडची सुपरस्टार असूनही दीपिका ‘जवान’च्या सेटवर पहिल्या दिवशी अतिशय साध्या लूकमध्ये आली होती. तिने मेकअप सुद्धा केला नव्हता. पहिल्याच दिवशी पांढऱ्या रंगाची साडी नेसून ती सेटवर आली होती. मी कधीच कोणत्याही अभिनेत्रीला मेकअपशिवाय सेटवर आलेलं पाहिलं नव्हतं. दीपिका ‘जवान’ चित्रपटाचा एक भाग झाली याकरता या मुलाखतीद्वारे मी पुन्हा एकदा तिचे आभार मानतो.”

हेही वाचा : Video : “खोबऱ्याचं सारण, सुंदर कळ्या अन्…”, अभिनेत्री स्पृहा जोशीने बनवले उकडीचे मोदक, पाहा व्हिडीओ

दरम्यान, शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांकडून कायमच सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे. ‘ओम शांती ओम’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘हॅपी न्यू इयर’, ‘पठाण’ आणि आताचा ‘जवान’ शाहरुख-दीपिकाने एकत्र काम केलेला प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. ७ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या जवान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५४३.०९ कोटींची कमाई केली आहे.