शाहरुख खानचा जवान चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ७ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. कमाईत या जवानने अनेक रेकॉर्डही तोडले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अॅटली कुमारने केलं आहे. नुकतचं एका मुलाखतीत अॅटलीने शाहरुखबरोबर काम करतानचा अनुभव शेअर केला आहे. एवढंच नाही तर जवान चित्रपटाला ऑक्ससाठी पाठवण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.




ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अॅटलीने याबाबत वक्तव्य केलं आहे. अॅटली म्हणाला, “२०२० मध्ये मी शाहरुखला चित्रपटाची स्क्रिप्ट सांगितली होती. मी चित्रपटाची स्क्रिप्ट शाहरुखला झूम कॉलद्वारे सांगितली. मी असे कधीच कोणाला सांगितले नव्हते. पण त्यावेळी लॉकडाऊन होते. त्यामुळे मी गोष्टी पूर्ववत येण्याची वाट न बघता झूम कॉलद्वारे शाहरुखला चित्रपटाची कथा ऐकवली होती.”
हेही वाचा- Video : लग्नाअगोदर परिणिती चोप्रा व राघव चड्ढा यांच घर सजलं; रोषणाई केल्याचा व्हिडीओ आला समोर
अॅटली पुढे म्हणाला “मला ‘जवान’ चित्रपटाला ऑस्करपर्यंत घेऊन जायचे आहे. शाहरुख खानने ही मुलाखत बघावी असं मला वाटतं. मी शाहरुखला फोन करून हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्याची विनंती करणार आहे.”
‘जवान’च्या कमाईबाबत बोलायचं झालं तर चित्रपट लवकरच ५०० कोटींचा टप्पा गाठणार आहे. या चित्रपटाने १२ दिवसांत ४९३ कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट या वर्षातील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.