भारतातील अनेक महिला पाश्चात्य कपडे का परिधान करतात असा सवाल ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी नुकताच केला. आपली नात नव्या नवेली नंदा आणि मुलगी श्वेता बच्चनबरोबरच्या ‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्टमध्ये संवाद साधताना जया बच्चन यांनी याविषयी सवाल केला आहे. पॉडकास्टच्या नवीन भागाचा विषयदेखील तितकाच मजेशीर होता. या पॉडकास्टमध्ये जय बच्चन यांनी नेहमीप्रमाणे मनमोकळेपणे गप्पा मारल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या भागात जया यांनी श्वेता आणि नव्याला प्रश्न विचारला की, “भारतीय महिला या सध्या पाश्चात्य कपडे का परिधान करतात?” यावर श्वेताने उत्तर द्यायचा प्रयत्न केला ती म्हणाली, “सध्या महिला या फक्त घरात बसून नसतात, त्या बाहेर पडतात, मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कामाला जातात. त्यामुळेच बाहेर वावरायला सोप्पं पडतं म्हणून त्या पॅन्ट शर्टसारखे पाश्चात्य कपडे परिधान करतात.”

आणखी वाचा : विराट-अनुष्का मुलीसह मंदिरात झाले नतमस्तक, चाहत्यांबरोबर घालवला वेळ; उत्तराखंड ट्रीपचे फोटो व्हायरल

श्वेताने दिलेल्या उत्तरामुळे जय बच्चन यांचं समाधान न झाल्याने त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. जया बच्चन म्हणाल्या, ““मला असं वाटतं की आपण नकळतपणे हे मान्य केलं आहे की पाश्चात्य पोशाख परिधान केल्यावर स्त्रीयांना पुरुषाएवढी ताकद आणि क्षमता मिळते. मला एक स्त्री तिच्या मूळ स्त्रीशक्तिच्या रूपात पाहायला आवडेल. याचा अर्थ साडीच नेसली पाहिजे असा आग्रह माझा अजिबात नाही, पण पश्चिमेतही स्त्रिया त्यांचा पारंपरिक पोशाख परिधान करत असत. जेव्हा त्यांनी पॅंट घालायला सुरुवात केली तेव्हा ही संकल्पना पूर्णपणे बदलली.”

जया यांच्या वक्तव्याला औद्योगिक क्रांतिची जोड देत श्वेताने तिचा मुद्दा पुढे आणखीन स्पष्ट करायचा प्रयत्न केला. श्वेता म्हणाली, “औद्योगिक क्रांतीदरम्यान जेव्हा सर्व पुरुष युद्धात उतरले, तेव्हा स्त्रिया रोजीरोटीसाठी कारखान्यात काम करू लागल्या आणि त्यांना पँट घालावी लागली कारण तिथल्या अवजड मशीन्सवर काम करण्यासाठी तेच सोयीचं आहे.”

जया बच्चन त्यांची मतं अत्यंत परखडपणे मांडत असतात. यापूर्वीच्या पॉडकास्टमध्ये, त्यांनी नातेसंबंधांबद्दल, मासिक पाळीच्या वेळी शूटिंगदरम्यान आलेल्या अनुभवांबद्दल विचार मांडले आहेत. चित्रपट उद्योगातील तिच्या शानदार कारकिर्दीतील काही किस्से देखील दिले आहेत. जया बच्चन पुढील करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामध्ये दिसणार आहेत. यामध्ये त्या आलिया भट्ट, रणवीर सिंग आणि धर्मेंद्र यांच्यासह महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jaya bachchan asks question in podcast with granddaughter navya about indian women clothing avn
First published on: 19-11-2022 at 16:55 IST