"एक आई आणि पत्नी म्हणून..." सिनेसृष्टीतून ब्रेक घेण्याबद्दल जया बच्चन यांचे स्पष्ट उत्तर | Jaya Bachchan does not like it when people say she sacrificed her career for Amitabh Bachchan and her children nrp 97 | Loksatta

“एक आई आणि पत्नी म्हणून…” सिनेसृष्टीतून ब्रेक घेण्याबद्दल जया बच्चन यांचे स्पष्ट उत्तर

जया बच्चन आणि श्वेता बच्चन यांनी महिला आणि त्याग या विषयावर भाष्य केले.

“एक आई आणि पत्नी म्हणून…” सिनेसृष्टीतून ब्रेक घेण्याबद्दल जया बच्चन यांचे स्पष्ट उत्तर
जया बच्चन

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन या नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतात. जया बच्चन यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. मात्र अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांनी सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला. जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांच्यासाठी करिअरचा त्याग केला, असे अनेकांनी त्यावेळी म्हटले होते. नुकतचं जया बच्चन यांनी यावर भाष्य केले. नात नव्या नवेली नंदा हिच्या ‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्टमध्ये जया बच्चन यांनी यावर सविस्तर उत्तर दिले.

जया बच्चन यांनी १९७१ मध्ये गुड्डी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडद्वारे पदार्पण केले. त्यांनी मिली, उपहार, कोरा कागज आणि अभिमान यासारख्या चित्रपटात काम केले. १९८१ मध्ये प्रदर्शित झालेल्या सिलसिला चित्रपटानंतर त्यांनी सिनेसृष्टीतून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी पूर्णपणे स्वत:च्या कुटुंबाला आणि मुलांना वेळ दिला. नुकतंच नात नव्या नवेली नंदा हिच्या ‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्टमध्ये जया बच्चन आणि श्वेता बच्चन यांनी महिला आणि त्याग या विषयावर भाष्य केले.
आणखी वाचा : “नातं टिकण्यासाठी शरीरसंबंध…” जया बच्चन यांचं वैवाहिक आयुष्यावर बोल्ड वक्तव्य

यावर जया बच्चन म्हणाल्या, “जेव्हा एखादी महिला काही ठराविक गोष्टी करते आणि त्याचे वर्णन करण्यासाठी तुम्ही जेव्हा त्याग किंवा बलिदान वापरला जातो, तेव्हा तो मला मुळीच आवडत नाही. तुम्ही तुमचा विचार करण्याआधी दुसऱ्या व्यक्तीचा विचार करता, त्याच्या भावनांचा विचार करता, त्यांच्या गरजांचा तुमच्या आधी विचार करता याला त्याग करणं म्हणत नाही. त्या गोष्टी तुम्ही मनापासून करत असता. मी अभिनयातून ब्रेक घेतला, तेव्हाही मी त्याग केला नव्हता. मला ते मनापासून करायचे होते, म्हणून मी ते केले.”

“मला आजही ते दिवस आठवतात जेव्हा मी सिनेसृष्टीतून ब्रेक घेणार असल्याचे सांगितले होते, त्यावेळी अनेकजण असं म्हणत होते की मी माझ्या लग्नासाठी आणि मुलांसाठी तिच्या करिअरचा त्याग केला. पण तसेच अजिबात नव्हते. एक आई आणि पत्नी म्हणून मी त्या गोष्टींचा आनंदाने स्वीकार केला होता. माझ्या आयुष्यात आलेल्या इतर गोष्टींपेक्षा खऱ्या आयुष्यातील आई आणि पत्नीची भूमिका मला जास्त आवडली. यासाठी मी काही त्याग केलाया, असे मला अजिबात वाटत नाही”, असे जया बच्चन यांनी सांगितले.

आणखी वाचा : “मी बालिश…” सतत चिडचिड करणाऱ्या स्वभावावर जया बच्चन स्पष्टच बोलल्या

दरम्यान जया बच्चन यांनी २००० मध्ये हृतिक रोशनबरोबर फिजा या चित्रपटातून पुन्हा सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी कभी खुशी कभी गम, कल हो ना हो, लागा चुनरी में दाग आणि द्रोण या सारख्या निवडक चित्रपटात काम केले. आता लवकरच त्या करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 12:45 IST
Next Story
“…अजूनही माझा थरकाप उडतो”, अनुपम खेर यांनी सांगितला होता ‘हॉटेल मुंबई’ चित्रपटात काम करण्याचा अनुभव