अभिनेत्री जया बच्चन अभिनयासोबतच त्यांच्या स्वभावासाठी ओळखल्या जातात. त्यांचा स्वभाव हा रागीट असल्याचे बऱ्याचदा समोर आले आहे. अनेक प्रसंगी जया बच्चन सार्वजनिक ठिकाणी रागावतानाही दिसल्या आहेत. त्यांचे फोटो घेणाऱ्या, त्यांच्याबरोबर फोटो काढू इच्छिणाऱ्या चाहत्यांना फटकारताना त्या दिसल्या आहेत. आता पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार घडला. दुर्गापूजेच्यानिमित्ताने त्या एके ठिकाणी गेल्या असताना जया बच्चन यांना अचानक राग आला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : हिंदुस्तानी भाऊचे ‘गुडबाय’ चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन, ‘या’ कारणामुळे व्यक्त केला संताप

Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
sharad pawar
धमक्यांना घाबरू नका, ‘त्यांना’ दुरुस्त करण्याची वेळ; शरद पवार यांचे अजित पवारांना थेट आव्हान
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा

जया बच्चन बुधवारी सकाळी आपला मुलगा अभिनेता अभिषेक बच्चनसोबत भोपाळला गेल्या होत्या. त्या दोघांनी न्यू मार्केटमधील कालीबारी येथील देवीचे दर्शन घेतले. त्यावेळी जया बच्चन आणि अभिषेक यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली. यानंतर तेथे उपस्थित असलेले चाहते जया बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी उत्सुक होते. अभिषेक बच्चन आनंदाने चाहत्यांना भेटला, तसेच त्याने चाहत्यांबरोबर सेल्फीही काढले. मात्र चाहत्यांनी जया बच्चन यांना सेल्फीसाठी घेरल्याने त्यांना राग आला.

स्वत:ला चाहत्यांच्या गर्दीने वेढलेले पाहून जया बच्चन यांना इतका राग आला की त्यांनी चाहत्यांना फटकारण्यास सुरुवात केली. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जया बच्चन “तुम्ही माझ्या डोळ्यात प्रकाश मारत आहात.”, “तुम्ही काय करत आहात? तुम्हाला लाज वाटत नाही का?” असे म्हणताना दिसत आहेत. जया बच्चन यांनी फटकारल्यानंतर चाहते त्यांच्यापासून दूर झालेले दिसले. या व्हिडीओतून जया बच्चन यांचा तापट स्वभाव पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

हेही वाचा : ‘ही’ होती ‘सिलसिला’ची कास्ट पण ‘या’ कारणाने झाली होती रेखा आणि जया यांची एंट्री

दरम्यान, जया बच्चन लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात दिसणार आहेत. करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करत आहे. यात आलिया भट्ट, रणवीर सिंग, धर्मेंद्र, शबाना आझमी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.