scorecardresearch

Premium

दिवाळीच्या दिवशीही जया बच्चन यांना संताप अनावर; नेटकरी म्हणाले, “मग संसदेतही…”

अभिनेत्री जया बच्चन यांना त्यांच्या रागीट स्वभावामुळे अनेकदा ट्रोल केले जाते.

jaya-bachchan

अभिनेत्री जया बच्चन यांना त्यांच्या रागीट स्वभावामुळे अनेकदा ट्रोल केले जाते. त्या सतत चिडचिड करताना, रागवताना, पापाराझींवर भडकतानाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. तसेच त्यांच्याबरोबर फोटो काढणाऱ्यांवरही ते भडकताना दिसतात. दिवाळीच्या दिवशीही असेच काहीसे चित्र दिसले. जया बच्चन पुन्हा एकदा त्यांचे फोटो काढण्यासाठी आलेल्या मीडिया फोटोग्राफर्सवर चिडल्या आणि त्यावरून पुन्हा त्यांच्यावर नेटकरी निशाणा साधत आहेत.

हेही वाचा : दिवाळीच्या मुहुर्तावर नयनतारा आणि विग्नेशच्या मुलांची पहिली झलक समोर, फोटो पाहिलात का?

vinod-khanna
“चित्रपटात काम केलं तर गोळी मारेन”; दिवगंत अभिनेते विनोद खन्ना यांना वडिलांनी दिलेली धमकी, काय आहे ‘तो’ किस्सा? घ्या जाणून
war 2
अयान मुखर्जीकडून चाहत्यांना खास सरप्राइज; हृतिक रोशनच्या ‘या’ चित्रपटात सलमान, शाहरुखची होणार एन्ट्री
dr Balram Bhargava after seeing nana patekar in the vaccine war
‘द व्हॅक्सिन वॉर’मध्ये नाना पाटेकर यांना स्वतःच्या भूमिकेत पाहून भावुक झाले डॉ. बलराम भार्गव, म्हणाले…
vishakha subhedar
“…म्हणून मला विनोदी अभिनेत्रीचा टॅग नको होता”; विशाखा सुभेदार यांच विधान चर्चेत, म्हणाल्या, “भीती वाटायची की…”

सध्या सोशल मीडियावर जया बच्चन यांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. या व्हिडीओत त्यांचे संपूर्ण घर दिव्यांनी सजवलेले आहे. पण जया बच्चन मात्र घराबाहेर उभ्या राहून मीडिया फोटोग्राफर्सना ओरडताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये ती पापराझींना म्हणतात की, “परवानगीशिवाय तुम्ही कसे काय फोटो काढत आहात?” त्यासोबतच त्या त्यांना घुसखोर म्हणत पापराझींना त्यांच्या घरासमोरून हाकलत आहेत.

जया बच्चन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. या व्हिडिओवर नेटकरी जोरदार कमेंट करत जया बच्चन यांना ट्रोल करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, “दुर्लक्ष करा. त्यांच्याकडे खूप अॅटीट्यूड आहे. त्यांच्या सर्व चित्रपटांवर बहिष्कार टाका.” तर काही लोक पापराझींचे समर्थन करतानाही दिसले. एका नेटकऱ्याने लिहिले, “त्यांना कॅमेऱ्याचा एवढा प्रॉब्लेम असेल तर संसदेतही कॅमेरा त्यांच्याकडे वळवू नये.”

आणखी वाचा : “बिग बी कसे आणि तुम्ही…”, जया बच्चन यांच्यावर नेटकरी नाराज, जाणून घ्या नेमकं काय घडलं

दरम्यान जया बच्चन या लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात दिसणार आहेत. करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करत आहे. यात आलिया भट्ट, रणवीर सिंग, धर्मेंद्र, शबाना आझमी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jaya bachchan got angry on the day of diwali rnv

First published on: 25-10-2022 at 11:35 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×