बॉलीवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन आणि दिग्गज अभिनेत्री जया बच्चन (पूर्वाश्रमीच्या जया भादुरी) यांनी ५१ वर्षांचे वैवाहिक जीवन पूर्ण केले असले, तरी आजही बिग बी आणि अभिनेत्री रेखा यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरूच असते. अमिताभ आणि रेखा यांनी यावर बोलत नसले, तरीही या विषयावर चर्चा सुरूच असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जया बच्चन यांना एका मुलाखतीत अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या नात्यांच्या चर्चांवर प्रश्न विचारण्यात आला होता. २००८ मध्ये ‘पीपल’ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर उत्तर दिले होते. जया बच्चन या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाला होत्या, “जर असं काही असतं, तर ते वेगळ्याच ठिकाणी असते, नाही का? लोकांना त्यांची जोडी पडद्यावर आवडली, आणि ते ठीक आहे. माध्यमांनी त्यांचे (अमिताभ बच्चन) यांचे नाव जवळपास प्रत्येक नायिकेशी जोडण्याचा प्रयत्न केला. जर मी हे सगळं गंभीरपणे घेतलं असतं, तर माझं आयुष्य नरक झालं असतं. आम्ही कणखर माणसं आहोत.”

हेही वाचा…अभिनेते टिकू तलसानिया यांना आला होता ब्रेनस्टॉक, मुलगी शिखाने दिली प्रकृतीची माहिती; पोस्ट करत म्हणाली…

अमिताभ बच्चन आणि रेखा पुन्हा एकत्र काम करतील का, यावरून जया बच्चन यांना विचारले असता, त्यांनी ठामपणे सांगितले होते की त्यांना काहीच हरकत नाही. “मला याचा त्रास का होईल? पण मला वाटतं की हा त्यांच्या एकत्र कामापेक्षा चर्चेचा विषय जास्त ठरेल. आणि हे दुर्दैवी आहे, कारण यामुळे त्यांना प्रेक्षकांना पुन्हा एकत्र पाहण्याची संधी मिळणार नाही. “

दीर्घकालीन विवाह कसा टिकवला, या प्रश्नावर जया बच्चन या मुलाखतीत म्हणाल्या होत्या, “फक्त त्यांना मोकळं (एकटं) सोडून. तुम्हाला निष्ठा ठेवावी लागते. मी एका चांगल्या माणसाशी लग्न केलं आणि निष्ठा जपणाऱ्या कुटुंबात आले . तुम्ही सहकाऱ्यावर खूप अधिकार गाजवू नये, विशेषतः आमच्या व्यवसायात, जिथे तुमच्यासाठी अनेक गोष्टी सोप्या नसतील हे मला माहीत आहे. तुम्ही कलाकाराला वेडा बनवू शकता किंवा त्याला प्रगतीसाठी मदत करू शकता. आणि जर तो गेला, तर तो तुमचा कधीच नव्हता!” असे जया बच्चन यांनी नमूद केले होते.

हेही वाचा…VIDEO : विराट-अनुष्का मुंबईत परतले! गेटवे ऑफ इंडियाला दिसले एकत्र, विरुष्काच्या चाहतीची ‘ती’ रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल

अमिताभ बच्चन आणि रेखा ही पडद्यावरील सर्वात लोकप्रिय जोड्यांपैकी एक मानली जाते. त्यांनी ‘दो अंजाने’ (१९७६), ‘खून पसीना’ (१९७७), ‘गंगा की सौगंध’ (१९७८), ‘मुकद्दर का सिकंदर’ (१९७८), ‘मिस्टर नटवरलाल’ (१९७९), ‘सुहाग’ (१९७९), ‘राम बलराम’ (१९८०) आणि ‘सिलसिला’ (१९८१) यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. परंतु, यश चोप्रांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘सिलसिला’ नंतर गेल्या ४३ वर्षांत ते पुन्हा स्क्रीन शेअर करताना दिसलेले नाहीत, ‘सिलसिला’ या सिनेमात जया बच्चन यांचीही महत्त्वाची भूमिका होती.