Jaya Bachchan Viral Video: जया बच्चन यांनी आजवर अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ७० च्या दशकात त्या एक लोकप्रिय अभिनेत्री होत्या. १९७१ ला प्रदर्शित झालेला ‘गुड्डी’, १९७३ ला प्रदर्शित झालेला ‘अभिमान’, १९७५ ला प्रदर्शित झालेला ‘शोले’ याबरोबरच ‘जंजीर’, ‘कोरा कागज’, ‘मिली’, ‘चुपके चुपके’ अशा अनेक चित्रपटांतून त्यांना लोकप्रियता मिळाली व त्यांच्या भूमिका गाजल्या.

२००० च्या दशकातीलदेखील त्यांचे काही सिनेमे गाजले. २००० ला प्रदर्शित झालेला ‘फिजा’, २००१ ला प्रदर्शित झालेला ‘कभी खुशी कभी गम’, २००३ ला प्रदर्शित झालेला ‘कल हो ना हो’ तसेच २००७ ला प्रदर्शित झालेला ‘लगा चुनरी में दाग’ अशा चित्रपटांत त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

याबरोबरच, २०१६ ला प्रदर्शित झालेल्या की अँड का तसेच २०२३ ला प्रदर्शित झालेल्या रॉकी और रानी की प्रेम कहानी अशा सिनेमात त्यांनी काम केले आहे.

जया बच्चन त्यांच्या भूमिकांमुळे तर चर्चेत असतातच, पण याबरोबरच त्या त्यांच्या वक्तव्यांमुळेदेखील चर्चेत असतात. त्यांच्या स्पष्टवक्तव्यांमुळे त्या अनेकदा लक्ष वेधून घेतात. तसेच, त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्या अनेकदा पापाराझींवर संताप व्यक्त करतात, ते व्हिडीओ चर्चांचा भाग बनतात. काही वेळा त्यावरून त्यांचे ट्रोलिंगही होते.

जया बच्चन यांचा व्हिडीओ व्हायरल

आता अशातच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जया बच्चन पापाराझींसमोरून जात आहेत. त्यावेळी पापाराझींमधील एक जण जया बच्चन यांना नमस्ते म्हणाला. त्यावर जया बच्चन हसत पण संथ गतीने नमस्ते असे म्हणताना दिसत आहेत. आणखी एकजण म्हणाला की तुम्ही खूप सुंदर दिसत आहात, ते ऐकून जया बच्चन थांबल्या व त्यांनी विचारले की हे कोण म्हटले? त्यावर एकाने मी म्हणालो असे सांगितले. त्यावर जया बच्चन वाह असे म्हणत असल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यानंतर त्या तिथून निघून जातात. जया बच्चन यांनी पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. त्या खूप सुंदर दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हा व्हिडीओ फिल्मीग्यानने शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी लिहिले, त्या चांगल्या मूडमध्ये आहेत.

याआधी अनेकदा पापाराझी त्यांचे फोटो काढत असताना त्या त्यांच्यावर संतापल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच एका मुलाखतीत त्यांनी पापाराझींबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती.

दरम्यान, जया व अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक नुकताच ‘राजा शिवाजी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे कौतुक होत असल्याचे पाहायला मिळत आहे.