दिवंगत अभिनेते राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्या चित्रपटांचा आजही चाहतावर्ग असल्याचे पाहायला मिळते. १९६०-७० च्या दशकात त्यांचे चित्रपट प्रदर्शित होणे प्रेक्षकांसाठी उत्सव असल्याचे मानले जायचे. त्या काळातील ते सुपरस्टार होते. मात्र, असे म्हटले जाते की जेव्हा त्यांचे चित्रपट फ्लॉप होत होते, त्यावेळी त्यांनी अ‍ॅडजेस्टमेंट करायला नकार दिला. यामुळे जेव्हा चित्रपटसृष्टीत अमिताभ बच्चन यांची एन्ट्री झाली तेव्हा राजेश खन्ना यांनी त्यांच्यावर वर्चस्व गाजवायला सुरुवात केल्याचे म्हटले जाते.

एका जुन्या मुलाखतीत पत्रकार अली पीटर जॉन यांनी राजेश खन्ना यांचा उतरता काळ फार जवळून पाहिल्याचे वक्तव केले होते. त्यांनी म्हटले होते, “डिंपल कपाडिया यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांच्या करिअरचा उतरता काळ सुरू झाला होता. पण, राजेश खन्ना यांनी त्यांचे मानधन कमी केले नाही”, असे रेडिफला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वक्तव्य केले होते.

Dharmendra And Rajesh Khanna
“मद्याच्या नशेत मी रात्रभर त्याला…”, दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी सांगितलेला ‘तो’ किस्सा; म्हणाले, “राजेश खन्नाला…”
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Amitabh Bachchan And Rishi Kapoor
“मी अमिताभ बच्चन नावाच्या वादळाचा…”, दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी सांगितलेली ‘ती’ आठवण
amitabh bachchan talked about rekha
रेखा यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल विचारल्यावर अमिताभ बच्चन म्हणाले होते, “ती माझी…”
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Puneri Pati
“उगाच पुण्याच्या पाट्या जगभर प्रसिद्ध नाहीत!” नो पार्किंगमध्ये गाडी लावणाऱ्यांना पुणेरी शैलीत टोला, पाहा पुणेरी पाटी
Sanjeev Kumar And Sachin Pilgaonkar
“माझा दारू प्यायलेला…”, सचिन पिळगांवकरांनी सांगितली संजीव कुमार यांच्याबरोबर कशी झाली होती मैत्री; म्हणाले, “ते घरी…”
govinda fan styed at his home as maid
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”

काय म्हणाली होती अभिनेत्री?

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “राजेश खन्ना यांना अमिताभ बच्चन यांच्यापासून असुरक्षित वाटत होते. ते अनेकदा अमिताभ बच्चन यांच्याविषयी पाठीमागे बोलत असत. जया भादुरी यांनादेखील ते म्हणत की, या माणसाबरोबर का फिरतेस. त्याचे काही होणार नाही. मात्र, तरीही त्यांनी अमिताभसोबत ‘बावर्ची’ हा चित्रपट केला. त्यावेळी त्यांनी अमिताभ यांचा अपमान केला. चित्रपटाच्या सेटवर राजेश खन्ना यांनी अमिताभ बच्चन यांच्याकडे दुर्लक्ष केले, त्यावेळी जया यांनी अमिताभला समजावले की त्यांच्या गैरवर्तणुकीकडे लक्ष नको देऊ. एक दिवस बघ तू कुठे असशील आणि हा कुठे असेल.” या घटनेचा मी स्वत: साक्षीदार होतो, असे पत्रकार अली पीटर जॉन यांनी या मुलाखतीत म्हटले होते. याबरोबरच, अली पीटर जॉन यांनी एकदा राजेश खन्ना हे बंगल्याच्या टेरेसवर जाऊन अतिशय वाईटप्रकारे रडल्याची आठवणदेखील सांगितली आहे.

हेही वाचा: औरंगाबादकर अभिनेत्रीचं १३ व्या वर्षी पदार्पण, सुपरहिट सिनेमे अन् बॉलीवूड सोडलं; आता गुगलमध्ये उच्च पदावर करतेय नोकरी

राजेश खन्ना यांचा आयुष्य़ाकडे बघण्याचा हा दृष्टिकोन शेवटपर्यंत होता असे म्हटले जाते. त्यांना ‘बिग बॉस’ या टीव्ही शोची ऑफरदेखील आली होती. प्रत्येक एपिसोडला त्यांना ३.५ कोटी रुपये देणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, त्यावेळी त्यांनी नकार दिला. जेव्हा त्यांचे मन बदलले आणि या शोमध्ये जाण्याचा विचार केला, त्यावेळी बिग बॉसच्या निर्मात्यांनी नकार दिल्याचे म्हटले जाते. डिंपल कपाडिया यांनीदेखील राजेश खन्ना यांच्या अशा वागण्याबद्दल ‘इंडिया टुडे’शी बोलताना खुलासा केला होता.