Jaya Bachchan says physical compatibility is important for long time relationships | "नातं टिकण्यासाठी शरीरसंबंध..." जया बच्चन यांचं वैवाहिक आयुष्यावर बोल्ड वक्तव्य | Loksatta

“नातं टिकण्यासाठी शरीरसंबंध…” जया बच्चन यांचं वैवाहिक आयुष्यावर बोल्ड वक्तव्य

वैवाहिक आयुष्याबाबत जया बच्चन यांनी बोल्ड वक्तव्य केलं आहे.

jaya bachchan, jaya bachchan what the hell navya, jaya bachchan on physical relationships, jaya bachchan on younger generation, navya nanda, shweta bachchan, जया बच्चन, अमिताभ बच्चन, नव्या नवेली नंदा, श्वेता बच्चन, व्हॉट द हेल नव्या
शरीरसंबंध ही दिर्घकालीन नात्याची गुरुकिल्ली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतात. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला लवकरच ५० वर्ष पूर्ण होणार आहेत. त्याआधी अलिकडेच नात नव्या नवेली नंदा हिच्या ‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्टमध्ये जया बच्चन यांनी लग्न आणि वैवाहिक आयुष्यावर भाष्य केलं. नव्याच्या पॉडकास्टचा विषय ‘मॉडर्न लव्ह : रोमान्स अँड रिग्रेट्स’ असा होता. या विषयावर बोलताना जया बच्चन यांनी वैवाहिक आयुष्य आणि शरीरसंबंधाबाबत बोल्ड वक्तव्य केलं. शरीरसंबंध ही दिर्घकालीन नात्याची गुरुकिल्ली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नव्या नवेलीच्या पॉडकास्टमध्ये जया बच्चन नात्याबद्दल सल्ला देताना म्हणाल्या, “कदाचित लोकांना माझं बोलणं चुकीचं वाटेल. पण शारीरिक आकर्षण अनुरुपता नात्यासाठी महत्त्वाची असते. नात्यांबाबत कोणतेही प्रयोग करण्याचा आमचा काळ नव्हता. पण आजच्या पिढीकडे ती संधी आहे. त्यांनी ते करायला हवं कारण एखादं नातं दीर्घकाळ टिकण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. एखाद्या नात्यात शरीरसंबंध नसतील तर ते नातं फार काळ टिकत नाही. तुम्ही केवळ प्रेम, ताजी हवा आणि तडजोडीवर तुमचं नातं टिकवून ठेवू शकत नाही.”

आणखी वाचा- “लग्न न करता तुला बाळ झालं, तरी…” जया बच्चन यांनी नात नव्याला दिलेला सल्ला चर्चेत

७४ वर्षीय जया बच्चन म्हणाल्या, “तरुण पीढीने शरीरसंबंधांबाबत मनात कोणत्याही प्रकारची अपराधीपणाची भावना ठेवायला नको. अशा प्रकारच्या अनुभवातून जाताना तरुण पीढीला अनेकदा अपराधी वाटतं. हे चुकीचं आहे. जर तुमचे एखाद्या व्यक्तीशी शरीरसंबंध असतील आणि तुम्हाला ते नातं परिपूर्ण वाटत नसेल तर हे खूप सामान्य आहे. त्याची लाज बाळगण्याचं कारण नाही. प्रत्येक मुलगी यातून जात असते. अनेकदा त्या हे सर्व कुटुंबापासून लपवतात हेही सामान्य आहे.”

आणखी वाचा- “मला अशी बायको नकोय…” लग्नाआधी अमिताभ यांनी जया बच्चन यांना ऐकवला होता निर्णय

जया बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन याबद्दल बोलताना म्हणाली, “महिलांवर शरीरसंबंधांबद्दल बंधन त्यांना कंट्रोल करण्यासाठी घातली जातात. महिला त्यांच्या स्वतःच्या शरीराबद्दल बोलू शकत नाही. आजही अनेकदा महिलांचे सगळे निर्णय हे पुरुषच घेत असतात.” श्वेताचं बोलणं ऐकल्यानंतर जया बच्चन यांनी हे खूपच भयंकर असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान याच पॉडकास्टमध्ये जया बच्चन यांनी नातीला म्हणजेच नव्या नवेली नंदा लग्नाआधी आई झाल्यास हे त्यांना मान्य असेल असंही सांगितलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-10-2022 at 15:57 IST
Next Story
“मै किसीके बच्चे का बाप बनने वाला हूँ…” रितेश देशमुख-जिनिलियाच्या ‘मिस्टर मम्मी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित