अभिनेत्री जया बच्चन त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्या फार चर्चत आहेत. जया यांनी त्यांच्या मुलीसह, श्वेता बच्चन नंदासह ‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्ट चॅनलला भेट दिली होती. विशेष म्हणजे हे चॅनल त्यांची नात नव्या नवेली नंदाने सुरु केले आहे. पॉडकास्टच्या निमित्ताने बच्चन कुटुंबातील तीन पिढ्या एकत्र दिसल्या. या भागामध्ये जयाजींनी वेगवेगळ्या विषयांवर मत मांडत त्यामागील स्पष्टीकरण सुद्धा दिले.

त्या म्हणाल्या, “एखाद्या नात्यामध्ये प्रेमाबरोबर शारीरिक आकर्षण आणि अनुकूलता असणं आवश्यक असतं असं मला वाटतं. हे वक्तव्य काहींना आक्षेपार्ह वाटू शकते. आत्ताची पिढी पार्टनरसह त्यांच्या रिलेशनशिपमध्ये काही प्रयोग करत आहेत. आमच्या काळामध्ये असं करण्याची मुभा नव्हती. नातं टिकण्यासाठी शारीरिक जवळीक गरजेची असते. त्याशिवाय त्या नात्याला काहीच अर्थ राहणार नाही. फक्त प्रेम, मोकळीक आणि समजूतदारपणा दाखवून नातं टिकणं अवघड असतं.”

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)

आणखी वाचा – भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया ड्रग्ज केस प्रकरण, एनसीबीकडून २०० पानांचं आरोपपत्र दाखल

त्या नव्याला संबोधून म्हणाल्या, “मी याकडे वैद्यकीयदृष्ट्या पाहते. सध्या सर्वत्र भावनाशून्य लोक पाहायला मिळतात. माझ्या मते, तु तुझ्या बेस्ट फ्रेन्डशी लग्न करायला हवंस. ती व्यक्ती तुला फार प्रिय आहे. परिणामी त्या व्यक्तीला तू ‘मला तू आवडतोस म्हणून मला तुझ्या बाळाला जन्म द्यायला आवडेल’ असं म्हणू शकतेस . पण याउलट आपल्याकडे मला तू आवडतोस म्हणून लग्न करुया असे शिकवले जाते. लग्न न करता तुला बाळ झालं, तरी मला चालणार आहे.”

आणखी वाचा – “जेव्हा वयाच्या तिशीत तुम्हाला मुलं नसतात…” प्रार्थना बेहरेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

जया बच्चन यांनी त्यानंतर “कधी-कधी आम्ही हा अनुभव घेऊ शकलो नाही याची खंत वाटते. आमच्यानंतर श्वेताच्या पिढीतल्यांनाही नात्यामध्ये प्रयोग करण्याची संधी मिळाली नाही. आता तुझ्या (नव्या) पिढीमधले तरुण हे करु शकतात पण त्यांच्या मनामध्ये हा अनुभव घेताना दोषी असल्याची भावना येते, जे खूप चुकीचं आहे”, असे विधान केले.