“लग्न न करता तुला बाळ झालं, तरी…” जया बच्चन यांनी नात नव्याला दिलेला सल्ला चर्चेत

या भागामध्ये त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर मत मांडत त्यामागील स्पष्टीकरण सुद्धा दिले.

wth navya
जया यांनी त्यांच्या मुलीसह, श्वेतासह 'व्हॉट द हेल नव्या' या पॉडकास्ट चॅनलला भेट दिली होती.

अभिनेत्री जया बच्चन त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्या फार चर्चत आहेत. जया यांनी त्यांच्या मुलीसह, श्वेता बच्चन नंदासह ‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्ट चॅनलला भेट दिली होती. विशेष म्हणजे हे चॅनल त्यांची नात नव्या नवेली नंदाने सुरु केले आहे. पॉडकास्टच्या निमित्ताने बच्चन कुटुंबातील तीन पिढ्या एकत्र दिसल्या. या भागामध्ये जयाजींनी वेगवेगळ्या विषयांवर मत मांडत त्यामागील स्पष्टीकरण सुद्धा दिले.

त्या म्हणाल्या, “एखाद्या नात्यामध्ये प्रेमाबरोबर शारीरिक आकर्षण आणि अनुकूलता असणं आवश्यक असतं असं मला वाटतं. हे वक्तव्य काहींना आक्षेपार्ह वाटू शकते. आत्ताची पिढी पार्टनरसह त्यांच्या रिलेशनशिपमध्ये काही प्रयोग करत आहेत. आमच्या काळामध्ये असं करण्याची मुभा नव्हती. नातं टिकण्यासाठी शारीरिक जवळीक गरजेची असते. त्याशिवाय त्या नात्याला काहीच अर्थ राहणार नाही. फक्त प्रेम, मोकळीक आणि समजूतदारपणा दाखवून नातं टिकणं अवघड असतं.”

आणखी वाचा – भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया ड्रग्ज केस प्रकरण, एनसीबीकडून २०० पानांचं आरोपपत्र दाखल

त्या नव्याला संबोधून म्हणाल्या, “मी याकडे वैद्यकीयदृष्ट्या पाहते. सध्या सर्वत्र भावनाशून्य लोक पाहायला मिळतात. माझ्या मते, तु तुझ्या बेस्ट फ्रेन्डशी लग्न करायला हवंस. ती व्यक्ती तुला फार प्रिय आहे. परिणामी त्या व्यक्तीला तू ‘मला तू आवडतोस म्हणून मला तुझ्या बाळाला जन्म द्यायला आवडेल’ असं म्हणू शकतेस . पण याउलट आपल्याकडे मला तू आवडतोस म्हणून लग्न करुया असे शिकवले जाते. लग्न न करता तुला बाळ झालं, तरी मला चालणार आहे.”

आणखी वाचा – “जेव्हा वयाच्या तिशीत तुम्हाला मुलं नसतात…” प्रार्थना बेहरेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

जया बच्चन यांनी त्यानंतर “कधी-कधी आम्ही हा अनुभव घेऊ शकलो नाही याची खंत वाटते. आमच्यानंतर श्वेताच्या पिढीतल्यांनाही नात्यामध्ये प्रयोग करण्याची संधी मिळाली नाही. आता तुझ्या (नव्या) पिढीमधले तरुण हे करु शकतात पण त्यांच्या मनामध्ये हा अनुभव घेताना दोषी असल्याची भावना येते, जे खूप चुकीचं आहे”, असे विधान केले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-10-2022 at 13:37 IST
Next Story
“हा सर्व फालतूपणा…” ‘ब्रह्मास्त्र २’साठी KGF स्टार यशला कास्ट केल्याच्या चर्चांवर करण जोहरने सोडलं मौन
Exit mobile version