scorecardresearch

प्रसिद्ध पंजाबी अभिनेत्यावर जीममध्ये हल्ला, चाकूने केले वार; व्हिडीओ व्हायरल

‘जोधा अकबर’ फेम अभिनेत्यावर अमेरिकेतील जीममध्ये हल्ला

punjabi actor aman dhaliwal (1)
पंजाबी अभिनेता अमन धालीवलवर हल्ला. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

प्रसिद्ध पंजाबी अभिनेता अमन धालिवालवर अमेरिकेत हल्ला करण्यात आला आहे. जीममध्ये वर्कआउट करत असताना हा हमला झाल्याचं समोर आलं आहे. या हल्ल्यादरम्यानचा जीममधील एक व्हिडीओ समोर आला आहे. या हल्ल्यात अभिनेता जखमी झाला आहे.

अमन धालिवालवर हल्ला करतानाचा जीममधील व्हिडीओ एका ट्वीटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये हल्लेखोराने अमनवर चाकू रोखून धरल्याचं दिसत आहे. जीममध्ये व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या लोकांना तो धमकावत असल्याचंही पाहायला मिळत आहे. हल्लेखोराची नजर चुकवून अमनने त्याला खाली पाडल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर जीममधील इतर लोकांनी त्या हल्लेखोराला पकडून ठेवलं आहे. या झटापटीत अभिनेत्याला दुखापत झाली आहे.

हेही वाचा>> घरातील ‘तो’ फोटो शेअर करत प्राजक्ता माळीची पोस्ट, म्हणाली “दोन कोपरे…”

हेही वाचा>> “परीक्षक पक्षपात करतात” , ‘मास्टरशेफ’मध्ये स्पर्धकाने फिल्टर कॉफी श्रीखंड बनवल्याने नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले “रणवीर बरार आता…”

मीडिया रिपोर्टनुसार, जीममधील या हल्ल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी हल्लेखोराला ताब्यात घेतलं आहे. अमेरिकेतील ३६८५ ग्रँड ओक्स स्थित प्लॅनेट फिटनेस जीममध्ये सकाळी ९ वाजून २० मिनिटांच्या आसपास हा हल्ला झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर अमन धालिवालला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अभिनेता अमन धालिवालने पंजाबीबरोबरच बॉलिवूड चित्रपटांतही काम केलं आहे. मॉडेलिंगपासून त्याने करिअरला सुरुवात केली. ‘जोगिया वे जोगिया तेरी जोगन हो गया आन’ या गाण्यामुळे तो प्रसिद्धीझोतात आला. ‘एक कुड़ी पंजाब दी’ आणि ‘विरसा’ या चित्रपटांमुळे त्याला लोकप्रियता मिळाली. हृतिक रोशन व ऐश्वर्या रायच्या ‘जोधा अकबर’ चित्रपटात अमन महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 14:59 IST
ताज्या बातम्या