बॉलीवूडमध्ये सध्याच्या घडीला अनेक नवनवीन विषयांवर चित्रपट बनवले जात आहेत. एकीकडे बायोपिक आणि हॉरर कॉमेडी सिनेमाची लाट आलेली असताना दुसरीकडे राजकीय परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या ‘जेएनयू’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

‘जेएनयू : जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांमध्ये होणारा संघर्ष, राजकारण, दोन वेगवेगळ्या राजकीय विचारधारा, विद्यार्थ्यांची चळवळ याची झलक पाहायला मिळत आहे. उर्वशी रौतेला, पियुष मिश्रा, रवी किशन, सिद्धार्थ बोडके, विजय राज, रश्मी देसाई, अतुल पांडे आणि शिवज्योती राजपूत या कलाकारांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचा : ‘या’ अभिनेत्याकडे आहेत ११६ श्वान, मुंबईत ४५ कोटींच्या मालमत्तेत घेतली जातेय त्यांची काळजी, सोईसुविधा वाचून थक्क व्हाल

‘जेएनयू’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये गटबाजीच्या राजकारणामुळे कॅम्पसमध्ये कोणकोणत्या घटना घडतात. जातीवरुन विद्यार्थ्यांमध्ये पडलेले गट, वरिष्ठ विद्यार्थी नव्याने प्रवेश घेतलेल्या मुलांचं कसं मतपरिवर्तन करतात, त्यांना भडकवतात अशा ज्वलंत विषयावर हा चित्रपट भाष्य करतो. हे सगळे मुद्दे ट्रेलरमध्ये रोखठोकपणे मांडले आहेत. याशिवाय ट्रेलरमधील “अब हम लोग बोलेंगे भी और लड़ेंगे भी” असे टोकदार संवाद विशेष लक्ष वेधून घेतात. ‘जेएनयू’ चित्रपटाचं दिग्दर्शन विनय शर्मा यांनी केले असून ‘झी स्टुडिओ’ आणि प्रतिमा दत्त यांनी मिळून याची निर्मिती केली आहे.

हेही वाचा : हृतिक रोशनच्या ‘लक्ष्य’ला २० वर्षे पूर्ण; करिअरच्या शोधात भटकलेल्या तरुणाची कथा पुन्हा पाहता येणार मोठ्या पडद्यावर, कधीपासून जाणून घ्या…

‘जेएनयू’ चित्रपटात आणखी एका अभिनेत्याने विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. या अभिनेत्याचं नाव आहे सिद्धार्थ बोडके. अजय देवगणच्या ‘दृश्यम २’ चित्रपटात लहानशी भूमिका साकारल्यानंतर सिद्धार्थ आता ‘जेएनयू’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. पतीच्या या नव्या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत तितीक्षा तावडे लिहिते, “तू माझा अभिमान आहेस सिद्धार्थ… तू पडद्यावर एक वेगळीच जादू निर्माण करशील याची मला खात्री आहे. ‘जेएनयू’ चित्रपट २१ जूनला प्रदर्शित होत आहे. नक्की बघा!” अशी खास पोस्ट शेअर करत तितीक्षाने सिद्धार्थला या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : “५० वर्षे मुंबईत राहतोय, गिरणगावात मोठा झालो, पण…”, अंकुश चौधरीच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाला, “ही अस्वस्थता…”

तितीक्षाने ट्रेलर शेअर करत शुभेच्छा दिल्यावर सिद्धार्थ बोडकेने या व्हिडीओवर “आय लव्ह यू सो मच” अशी कमेंट केली आहे. सध्या अभिनेत्री तितीक्षा तावडे ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. दरम्यान, सिद्धार्थ बोडके महत्त्वाच्या भूमिकेत असणारा हा ‘जेएनयू’ चित्रपट येत्या २१ जूनला प्रदर्शित होणार आहे.