Juhi Chawla Son Arjun education: पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल जास्त माहिती मिळविण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. फक्त कलाकारांबद्दलच नाही, तर त्यांचे बायको वा नवरा, मुले असे एकंदरीत कुटुंब, रिलेशनशिप यांच्याबद्दलही जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. आता कलाकार सोशल मीडियावरही सक्रिय असतात. या माध्यमातून ते त्यांचे व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठीही उत्सुक असतात.

अभिनेत्री जुही चावला अनेक कारणांमुळे सतत चर्चेत असते. बॉलीवूडची सर्वांत श्रीमंत अभिनेत्री असल्यामुळेही ती अनेकदा चर्चेत येते. त्याबरोबरच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. ती तिचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करते. आता मात्र अभिनेत्री तिच्या मुलामुळे चर्चेत आली आहे.

जुही चावलाच्या मुलाने ‘या’ युनिव्हर्सिटीमधून घेतली पदवी

जुही चावला व जय मेहता यांचा मुलगा अर्जुन मेहताने नुकतीच ग्रॅज्युएशनची डिग्री पूर्ण केली. अर्जुनने कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून पदवी शिक्षण घेतले आहे. जुही चावलाने सोशल मीडियावर त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

जुहीने अर्जुनच्या पदवी प्रदान सोहळ्यातील अनेक व्हिडीओ आणि फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो व व्हिडीओ शेअर करीत तिने मुलाला शुभेच्छा दिल्या. तिने असेही लिहिले की initiated into the elite Phi Beta Kappa Society. (Phi Beta Kappa Society मध्ये निवड होणे म्हणजे विद्यार्थ्याला अमेरिकेतील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एकामध्ये स्थान मिळणे. विशेषतः कला आणि विज्ञान शाखेत उत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना हा सन्मान दिला जातो. विद्यापीठात मिळवलेले उत्कृष्ट शैक्षणिक यश म्हणून याकडे पाहिले जाते.)

या फोटोंमध्ये त्याच्याबरोबर जय मेहता आणि कुटुंबातील इतर सदस्यसुद्धा दिसत आहेत. जुहीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अर्जुनवर कौतुकासह शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसेच, अनेकांनी संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा दिल्या आहेत.

२०२३ मध्ये जुही व जय मेहता यांची मुलगी जान्हवीनेदेखील याच विद्यापीठातून पदवी मिळवली होती. त्यावेळीदेखील पदवी प्रदान सोहळ्यात जुही व जय मेहता यांनी हजेरी लावली होती. या पदवी प्रदान सोहळ्याचे काही फोटो पाहायला मिळाले होते.

जुही चावला कायमच तिच्या मुलांचे फोटो, व्हिडीओ शेअर करीत असते. त्यातून ती तिच्या भावना व्यक्त करते. तसेच मुलांच्या वाढदिवसालादेखील ती अनेक अनसीन फोटो शेअर करते. त्या निमित्ताने जुहीच्या मुलाच्या लहानपणीचे फोटो पाहायला मिळतात.

याबरोबरच जुही स्वत:चेही विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असते. तिच्या या फोटोंवर चाहते कमेंट्स करत तिचे कौतुक करतात.

दरम्यान, जुही चावला आगामी काळात कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.