आमिर खानचा मुलगा अभिनेता जुनैद खानचा दुसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लवयापा’ हा थिएटरमध्ये रिलीज होणारा त्याचा पहिला चित्रपट आहे. त्याचा पहिला चित्रपट ‘महाराज’ नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. सध्या जुनैद त्याच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जुनैदने सांगितलं की त्याची लहान बहीण आयरा खानच्या लग्नात त्याला मोठा भाऊ असला तरी कोणतीही जबाबदारी देण्यात आली नव्हती. त्याला पार्ट्यांमध्ये जाणं आवडत नाही, त्यामुळे बहिणीच्या लग्नातही बाहेर वेळ घालवल्याचं जुनैदने नमूद केलं.

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत जुनैद म्हणाला की त्याला पार्ट्या करायला आवडत नाही. तो मोठ्या आवाजात वाजणारं म्युझिक व जास्त लोक असलेल्या पार्ट्यांना जाणं टाळतो. “माझ्या बहिणीच्या लग्नानंतर, माझे वडील मला म्हणाले, ‘तू जर लग्न करायचं ठरवलं असेल तर प्लीज पळून जा आणि लग्न कर’,” असं जुनैद हसत म्हणाला. आयराचं लग्न २०२४ मध्ये नुपूर शिखरेशी झाला. बहिणीच्या लग्नात त्याला कोणतीही जबाबदारी दिली नव्हती, तसेच त्याला कोणी सल्लादेखील विचारला नाही, असं जुनैदने सांगितलं.

saif ali khan reveals why he took rickshaw to go hospital
रक्तबंबाळ सैफ अली खान लक्झरी गाड्या असूनही रिक्षाने रुग्णालयात का गेला? म्हणाला, “रात्रभर आमच्या घरी…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Saif Ali Khan on knife attack Taimur asked me if I was going to die
हल्ल्यानंतर करीनाऐवजी ८ वर्षांचा तैमूर रुग्णालयात सोबत का आला? सैफ अली खानने सांगितलं कारण
Billionaire and spiritual leader the Aga Khan dies
Aga Khan dies : अब्जावधी रुपयांचं दान करणारे धर्मगुरु प्रिन्स आगा खान काळाच्या पडद्याआड, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक
Dodi Khan Denies Marriage Plans With Rakhi Sawant_
राखी सावंतशी तिसरं लग्न करण्यास पाकिस्तानच्या डोडी खानचा नकार; म्हणाला, “मी तुझे लग्न माझ्या…”
salman khan did not select in vivah movie
‘विवाह’मध्ये सलमान खानऐवजी शाहिद कपूरला का घेतलं होतं? दिग्दर्शक म्हणाले, “त्या भूमिकेसाठी निरागसपणा…”
Rakesh Roshan on Son Divorce
“सुझान खान आजही आमच्या कुटुंबातील सदस्य…”, ऋतिक रोशनच्या घटस्फोटावर वडील राकेश रोशन यांनी व्यक्त केलं मत
Saif ali khan
सैफ अली खानला मुंबईच्या जुहूमध्ये घ्यायचं होतं हक्काचं घर, पण….; अनुभव सांगत म्हणालेला, “इथे मुस्लीम…”

जुनैद म्हणाला, “आयराला हे चांगलंच माहीत होतं की कोणीही जुनैदकडून काहीही अपेक्षा ठेवू नये, कारण या सगळ्या गोष्टींमध्ये मी अजिबात तिची मदत करू शकत नाही. त्यामुळे कोणीही माझ्याशी काहीही चर्चा केली नाही. मला फक्त तारीख आणि वेळ सांगितली गेली आणि तिथे वेळेत पोहोचायला सांगितलं. त्यांचं म्हणणं असं होतं की मला काहीही काम सांगून फायदा नाही.” तो कौटुंबिक निर्णयांमध्ये भाग घेतो की तिथेही कुचकामी आहे? यावर जुनैद म्हणाला, “मी खरंच काहीच कामाचा नाही. ते मला सामील करून घेण्याचा खूप प्रयत्न करतात पण मी खूप कुचकामी आहे.”

junaid khan at sister Ira Khan wedding
जुनैद, आयरा व आझाद खान (फोटो – आयरा खान)

जुनैदने सांगितलं की तो पार्ट्यांमध्ये न जाता बाहेर बसणं पसंत करतो. तो म्हणाला, “आयराच्या लग्नातही मी बाहेरच होतो.” त्याने बाहेर आपला वेळ बाहेर कसा घालवला हे विचारल्यावर तो म्हणाला, “मी बाहेर काही लोकांसह, काही समविचारी लोकांबरोबर बसलो होतो.” वडिलांच्या घरी पार्टी असली तरी तो बाल्कनीत बसतो, असं जुनैदने सांगितलं.

दरम्यान, जुनैद खानचा दुसरा चित्रपट ‘लवयापा’ लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात खुशी कपूरदेखील आहे. याचे दिग्दर्शन अद्वैत चंदनने केले आहे.

Story img Loader