scorecardresearch

बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्याने ७०व्या वर्षी ३० वर्षांनी लहान गर्लफ्रेंडबरोबर केलेलं चौथं लग्न, पहिल्या पत्नीचं निधन झालं अन्…

बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्याने केली चार लग्न, वयाच्या ७०व्या वर्षी चौथ्यांदा बांधली लग्नगाठ

बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्याने ७०व्या वर्षी ३० वर्षांनी लहान गर्लफ्रेंडबरोबर केलेलं चौथं लग्न, पहिल्या पत्नीचं निधन झालं अन्…
बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्याने केली चार लग्न, वयाच्या ७०व्या वर्षी चौथ्यांदा बांधली लग्नगाठ

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते कबीर बेदी यांचा आज ७७वा वाढदिवस आहे. त्यांनी आजवर फक्त बॉलिवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूडमध्येही काम केलं आहे. त्यांनी आजवर उत्तमोत्तम भूमिका रुपेरी पडद्यावर साकारल्या. कामाबरोबर कबीर त्यांच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिले. त्यांनी एकूण चार लग्न केली. त्यांच्या प्रेमकथेची नेहमीच चर्चा रंगताना दिसली.

आणखी वाचा – ‘वेड’ची कमाई पाहून भारावली रितेश देशमुखची वहिनी, म्हणाली, “४१ कोटी रुपयांचा…”

कबीर यांचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं. त्यांनी १९६९मध्ये प्रोतिमा यांच्याशी पहिलं लग्न केलं. त्यांना पूजा व सिद्धार्थ अशी दोन मुलं झाली. त्यानंतर कबीर व अभिनेत्री परवीन बाबी यांच्यामध्ये जवळीक वाढली. दरम्यान कबीर व प्रोतिमा यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर प्रोतिमा यांचं निधन झालं. शिवाय परवीन यांच्याशीही कबीर यांचं नातं टिकू शकलं नाही.

त्यानंतर कबीर यांनी ब्रिटिश फॅशन डिझायनर सुसॅन हम्फ्रेस यांच्याशी लग्न केलं. या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. कबीर यांनी सुसॅनबरोबरही घटस्फोट घेतला. त्यानंतरही कबीर यांना योग्य जोडीदाराची गरज वाटू लागली. म्हणून त्यांनी १९९९०मध्ये निक्की यांच्याशी लग्न केलं. कबीर यांचं तिसरं लग्न १५ वर्ष टिकलं. पण त्यानंतर निक्की व कबीर एकमेकांपासून विभक्त झाले.

आणखी वाचा – Photos : आधी लग्न केलं, आता नवऱ्याचं दुसऱ्याच अभिनेत्रीबरोबर अफेअर असल्याचा राखी सावंतचा दावा, म्हणाली, “त्याने माझा..”

कबीर यांनी मात्र स्वतःला थांबवलं नाही. वयाच्या ७०व्या वर्षी त्यांनी चौथं लग्न केलं. हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. ७०व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी गर्लफ्रेंड परवीन दोसांज यांच्याबरोबर लग्न केलं. ३० वर्षांनी लहान मुलीबरोबर त्यांनी लग्नगाठ बांधील. कबीर व परवीन दहा वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. कबीर यांची चौथी पत्नी त्यांच्या लेकीपेक्षा फक्त ३ ते ४ वर्षांनी लहान आहे. वडिलांच्या चौथ्या लग्नानंतर कबीर यांची मुलगी पूजा त्यांच्यावर नाराज होती. आज कबीर त्यांच्या चौथ्या पत्नीबरोबर सुखाचा संसार करत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 16:02 IST

संबंधित बातम्या