काजोल, तिची बहीण तनिषा आणि त्यांची आई तनुजा यांच्यात किती घट्ट बॉंडिंग आहे हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या त्यांचं प्रेम व्यक्त करत असतात. त्याचप्रमाणे अनेक कार्यक्रमांमध्ये त्या एकत्र दिसतात. आता काजोल आणि तिची बहीण तनिषा यांनी मिळून आईला एक मोठी भेट दिली आहे.

काजोल आणि तनिषाने त्यांची आई तनुजा यांना लोणावळ्यात सर्व सोयी सुविधांनी उपलब्ध असलेला एक बंगला भेट दिला आहे. तनिषाने याचा एक व्हिडीओ पोस्ट करत ही बातमी शेअर केली. आठ महिने या बंगल्याचं काम सुरू होतं. त्या दोघींनी तनुजा यांना या बंगल्याबद्दल जराशीही माहिती कळू न देता या बंगल्याचं सगळं काम करून घेतल्याचं तनिषाने व्हिडीओ पोस्ट करताना लिहिलेल्या कॅप्शनमध्ये सांगितलं.

Divorce tendency of financially capable women
सुखी संसाराला अहंकाराचे ग्रहण! आर्थिक सक्षम महिलांचा घटस्फोटाकडे कल
free medical facility to employees on election duty
नागपूर: कर्मचाऱ्यांना नि:शुल्क उपचार, दिव्यांगांसाठी केंद्रावर व्हीलचेअर
Beer companies face dry day due to water shortage
पाणीटंचाईमुळे बिअर कंपन्यांवर ‘ड्राय डे’चे सावट
water scarcity, Pimpri chinchwad , shortage of water supply, Andhra Dam
पिंपरी : आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात घट…उपनगरांमध्ये पाणीटंचाई

आणखी वाचा : कौतुकास्पद! हृतिक रोशन बनला सैन्यातील अधिकाऱ्यांचा सांताक्लॉज, त्यांना दिली ‘ही’ खास भेट

काजोल आणि तनिषा गाडीतून तनुजा यांना लोणावळ्याला घेऊन आल्या आणि हा बंगला भेट देत मोठं सरप्राईज दिलं. गेटच्या बाहेर बांधलेली मोठी लाल रंगाची रिबीन कापत तनुजा यांनी या बंगल्यात प्रवेश केला. तसंच मुख्य दरवाजातून आतमध्ये आल्यावर त्यांनी या वास्तूला नमस्कारही केला.

हेही वाचा : प्रेक्षकांच्या ‘या’ सवयीमुळे बॉलिवूड चित्रपटांना मिळतंय अपयश, काजोलने मांडलं स्पष्ट मत

या घराचं फर्निचर सागवानी लाकडापासून बनवण्यात आल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. त्याचप्रमाणे या घरात सर्वत्र एलईडी लाइट्स बसवण्यात आलेले आहेत. या घराच्या हॉलला पांढऱ्या रंगाने रंगवण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे अंगणात भरपूर झाडंही आहेत. आता तनिषा आणि काजल यांनी मिळून तनुजा यांना दिलेलं हे मोठं सरप्राईज चाहत्यांनाही फार आवडलं आहे. या व्हिडीओवर कमेंट करत चाहते त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव करत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.