सोशल मीडियाद्वारे मालिका, चित्रपट, वेब शोचं प्रमोशन करणं कलाकारांसाठी अधिक सोपं झालं आहे. प्रमोशनसाठी कलाकार विविध स्टंट करतात. काजोल देवगणनही याला अपवाद नाही. काही तासांपूर्वी काजोलने इन्स्टाग्रामद्वारे एक पोस्ट शेअर केली. या पोस्टद्वारे “मी सोशल मीडियापासून ब्रेक घेत आहे” असं तिने सांगितलं. शिवाय तिच्या एका चिंताजनक पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पण यामागचं खरं कारण नेमकं काय? हे आता समोर आलं आहे.
“मी माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण काळामधून जात आहे” असं काजोलने म्हटलं. तिच्या या पोस्टनंतर चाहते अगदी चिंतेत होते. इतकंच नव्हे तर काजोलने तिच्या इतर सगळ्या इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट केल्या होत्या. पण यामागचं खरं कारण काही वेगळंच आहे. प्रमोशनचा एक भाग म्हणून तिने हे सगळं केलं. एक नवी पोस्ट शेअर करत तिने याबाबत माहिती दिली.
आणखी वाचा – भाड्याच्या घरात राहतो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रसिद्ध अभिनेता, घरभाडं किती? हेही सांगितलं अन्…
ओटीटीवर तिची ‘द ट्रायल-प्यार, कानुन, धोका’ नावाची वेबसीरिज येत आहे. याच सीरिजचा ट्रेलर १२ जूला प्रदर्शित होणार आहे. एक व्हिडीओ शेअर करत तिने याबाबत घोषणा केली. या सीरिजच्या प्रमोशनसाठीच काजोलने हा नवा स्टंट केला. आता इन्स्टाग्राम अकाऊंटवरील तिच्या सगळ्या पोस्टही दिसत आहेत. मात्र नेटकरी काजोलवर संतापले आहेत.
आणखी वाचा – “माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण काळ…”, पोस्ट शेअर करत काजोल देवगणने सोशल मीडियावरील सगळे फोटो केले डिलीट
काजोलची पोस्ट पाहिल्यानंतर तिचे चाहते चिंता व्यक्त करत होते. अनेकांनी कमेंट्सच्या माध्यमातून काजोलला काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. पण आता काजोलबाबत नकारात्मक कमेंट्स करण्यात येत आहेत. यापुढे तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार नाही, हा स्टंट योग्य नाही, थोडीतरी लाज बाळग, अशाप्रकारे प्रमोशन करणं योग्य नाही अशा अनेक कमेंट काजोलच्या नव्या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.