scorecardresearch

Video : दातांना लिपस्टिक लागली म्हणून काजोलने कॅमेऱ्यासमोरचं केलं असं काही की…; व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

काजोलच्या ‘त्या’ व्हिडीओची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा, पण असं घडलं तरी काय?

kajol cleaning her teath funny comments
काजोलच्या 'त्या' व्हिडीओची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा, पण असं घडलं तरी काय?

२६ वर्षांपूर्वी बॉबी देओल व काजोल देवगण ही जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसली. ‘गुप्ता’ हा त्यांचा पहिला एकत्रित चित्रपट. रुपेरी पडद्यावरील ही जोडी प्रेक्षकांच्याही पसंतीस पडली होती. आता बऱ्याच वर्षांनंतर एका कार्यक्रमानिमित्त काजोल व बॉबी एकत्र आले होते. मुंबईमधील गेटवे शाळेच्या एका कार्यक्रमासाठी दोघांनी हजेरी लावली होती. यादरम्यानचा दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – Video : लेकीच्या लग्नाचा आनंद गगनात मावेना, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा होणाऱ्या जावयाबरोबर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

काजोल व बॉबीला एकत्र पाहिल्यानंतर फोटोसाठी पापाराझी छायाचित्रकारांनी त्यांना घेरलं. या व्हिडीओमध्ये दोघंही एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. पण या व्हिडीओमधील काजोलच्या एका गोष्टीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरीही काजोलला पाहून गमतीशीर कमेंट करत आहेत.

आणखी वाचा – शिल्पा शेट्टीची आई रुग्णालयात दाखल, अभिनेत्रीने फोटो शेअर करत दिली माहिती, म्हणाली, “शस्त्रक्रिया…”

नेमकं काय घडलं?

काजोल कार्यक्रमामधील एक संबंधित व्यक्तीशी बोलत होती. या व्यक्तीशी बोलत असताना तिने चक्क बोटाने दात घासले. यामागचं कारण म्हणजे तिच्या दाताला लिपस्टिक लागली होती. काजोलचा हाच क्षण कॅमेऱ्यामध्येही कैद झाला. त्यानंतर काजोबाबत नेटकरी अनेक हास्यास्पद कमेंट करत आहेत.

इतर सामान्य महिलांना त्यांच्याप्रमाणेच काजोल आहे असं हा व्हिडीओ पाहून वाटत आहे. एवढे पैसे असूनही स्वस्त लिपस्टिक तू वापरते, काजोल सेलिब्रिटी असूनही कोणतेच नखरे नाही. काजोल अगदी बिनधास्त आहे अशा विविध कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर अनेकांना ती रिअल लाइफमधील अंजली वाटत आहे. काजोलचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-03-2023 at 11:58 IST
ताज्या बातम्या