यंदा भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन पार पडला. दरवर्षीप्रमाणे देशाची राजधानी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. यंदा भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष Prabowo Subianto प्रमुख पाहुणे म्हणून आले आहेत. याचनिमित्त शनिवारी २५ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात इंडोनेशियाच्या शिष्टमंडळाने बॉलीवूडच्या सिनेमाचे गाणे आपल्या अंदाजात गात उपस्थितांची मने जिंकली आहेत. यावेळी त्यांनी ‘कुछ कुछ होता है’ गाणे गायले. करण जोहर दिग्दर्शित ‘कुछ कुछ होता है’ च्या टायटल ट्रॅक मध्ये शाहरूख खान, राणी मुखर्जी, काजोल झळकले होते.

जतीन ललितने हे गाणे तयार केले असून उदीत नारायण आणि अल्का याज्ञिक ने ते गाणे गायले आहे. इंडोनेशियन प्रतिनिधींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या बँक्वेटमध्ये ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाचे टायटल गाणे गायल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर अभिनेत्री काजोलने प्रतिक्रिया दिली आहे.

रविवारी काजोलने एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेला व्हिडीओ पुन्हा पोस्ट करत लिहिले, “बॉलीवूडच्या लोकांना एकत्र आणण्याचा शक्तीचा पुन्हा प्रत्यय आला! इंडोनेशियन प्रतिनिधींनी ‘कुछ कुछ होता है’ गाणे गात जो आदरभाव दाखवला आहे तो खूप हृदयस्पर्शी आहे. मला माझा सन्मान झाल्यासारखा वाटतोय!”

शनिवारी २५ जानेवारी २०२५ रोजी , राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात इंडोनेशियन प्रतिनिधींनी ‘कुछ कुछ होता है’ गाणे सादर केले. या कार्यक्रमात वरिष्ठ इंडोनेशियन मंत्र्यांनीही सहभाग घेतला होता.

‘कुछ कुछ होता है’ चित्रपटात शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत होते. सलमान खान, अर्चना पूरण सिंग, अनुपम खेर आणि जॉनी लिव्हर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. करण जोहरच्या दिग्दर्शित हा सिनेमा हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला होता. जतीन-ललित यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि उदित नारायण व अलका याज्ञिक यांनी गायलेल्या या गाण्याने प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केले होते आणि आजही लोकांना ते गाणे आवडते.

Story img Loader