२०२२ हे वर्ष बॉलिवूडसाठी अत्यंत वाईट ठरलं. यावर्षी अनेक चित्रपटांवर बहिष्कार टाकण्यात आला. अमिताभ बच्चन, हृतिक रोशन, अक्षय कुमार, आयुष्मान खुराना यांसारख्या बड्या स्टार्सचे चित्रपटही प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचण्यास अपयशी ठरले. तसंच अनेक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले. मोजकेच हिंदी चित्रपट यावर्षी चांगली कमाई करू शकले. सिनेसृष्टीच्या या वाईट काळाबद्दल आतापर्यंत अनेक कलाकारांनी भाष्य केलं. आता अभिनेत्री काजोल यावर व्यक्त झाली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या तिच्या ‘सलाम वेंकी’ या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काजोल या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन ती तिच्या आगामी चित्रपटाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही भरभरून बोलत आहे. तिने ‘महाराष्ट्र टाइम्स’ला नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत “सध्या बॉक्स ऑफिसवर अनेक हिंदी चित्रपट अपयशी होत आहेत. तर असं होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे असं तुला वाटतं?” असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावेळी तिने प्रेक्षकांच्या एका सवयीकडे बोट दाखवलं आहे.

actor pratik gandhi talks about experience working with vidya balan
‘चरित्रपटांचं आव्हान अधिक भावतं’
colors marathi this serial will go off air
‘कलर्स मराठी’वरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! कलाकार भावुक, २ वर्षे गाजवलं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

आणखी वाचा : अक्षय कुमार नाही तर ‘हे’ अभिनेते आहेत सर्वाधिक मानधन घेणारे भारतीय कलाकार

काजोल म्हणाली, “करोना काळात अनेक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले. त्यामुळे प्रेक्षकांना ओटीटीवर चित्रपट बघायची सवय लागली. ती प्रेक्षकांची सवय मोडायला हवी. प्रेक्षकांनी चित्रपटगृहांत येऊनच चित्रपट पाहायला हवेत. यापूर्वीही सिनेसृष्टी वाईट काळातून गेली आहे. असा काळ आला की चित्रपट यशस्वी होण्यासाठी काय केलं पाहिजे असं विचारलं जातं. पण असा कोणताही विशेष फॉर्म्युला नाही आणि यापूर्वीही नव्हता. प्रेक्षकांना काय बघायचंय आणि ते काय स्वीकारत आहेत यावर चित्रपटाचं यश अवलंबून असतं.”

हेही वाचा : “…म्हणून मराठीत काम करत नाही”; अखेर काजोलने सांगितलं कारण

दरम्यान काजोलचा ‘सलाम वेंकी’ हा चित्रपट ९ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात काजोल, राजीव खंडेलवाल, विशाल जेठवा, आहाना कुमरा, प्रकाश राज यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. त्याचप्रमाणे आमिर खानही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.