scorecardresearch

सार्वजनिक नवरात्रोत्सवात मुलगा युगने वाढलं जेवण, व्हिडीओ शेअर करत काजोल म्हणाली “चूका होतात पण…”

काजोलने तिच्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सार्वजनिक नवरात्रोत्सवात मुलगा युगने वाढलं जेवण, व्हिडीओ शेअर करत काजोल म्हणाली “चूका होतात पण…”
काजोल आणि युग नवरात्रोत्सवात भक्तांना जेवण वाढताना दिसत आहेत.

संपूर्ण देशभरात दुर्गापूजा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सध्या देशात नवरात्रोत्सव जोरदार साजरा केला जात आहे. ज्यात अनेक ठिकाणी बॉलिवूड कलाकारही सहभागी होताना दिसत आहेत. ज्यात सुश्मिता सेन, काजोल या अभिनेत्रींची नाव विशेषतः घेतली जातात. अभिनेत्री काजोल दरवर्षी आई तनुजा आणि बहीण तनिषा यांच्यासह दुर्गापूजा करताना दिसते. यावेळी ती मुलगा युग देवगणसह सार्वजनिक नवरात्रोत्सवात पूजा करताना, देवीचं दर्शन घेताना आणि भक्तांची सेवा करताना दिसली.

काजोलने तिच्या इन्स्टाग्राम एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती तिचा मुलगा युगसह दिसत आहे. लाल रंगाच्या साडीत काजोल खूपच सुंदर दिसत आहे. चेहऱ्यावर कमीत कमी मेकअप आणि हाय पोनीटेलसह तिने हा लूक पूर्ण केला होता. तर काजोलचा मुलगा युगनेही आईसह मॅचिंग कुर्ता परिधान केला होता. काजोलचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होताना दिसतोय. कारण यात काजोल आणि युग नवरात्रोत्सवात भक्तांना जेवण वाढताना दिसत आहेत.
आणखी वाचा-Bigg Boss Marathi 4 : “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही…” बिग बॉसच्या घरात महेश मांजरेकरांचं वक्तव्य

काजोलने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये युग आईच्या मदतीने नवरात्रोत्सवात जेवण करत असलेल्या लोकांना जेवण वाढताना दिसत आहेत. अर्थात यावेळी युगकडून काही चुकाही झाल्या मात्र त्याने प्रयत्न केला यावर काजोलने आनंद व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिलं, “पूजा करताना चुका होतात पण त्या समजून घेणं आणि सेवा करणाऱ्या माझ्या मुलाचा मला अभिमान वाटतो. अशाप्रकारे परंपरा पुढे चालत राहते.” युगच्या या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे.

आणखी वाचा- अभिनेत्री काजोल बहीण तनिषासह देवीच्या भक्तीत झाली तल्लीन, साजरा केला नवरात्रोत्सव

दरम्यान काजोल दरवर्षी तिचा मित्रपरिवार आणि कुटुंबियांसह नवरात्रोत्सव साजरा करताना दिसते. एवढंच नाही तर ती मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळात जाऊन देवीचं दर्शनही घेताना दिसते. यावर्षीही ती बहीण तनिषा आणि आणि तनुजा यांच्यासह देवीचं दर्शन घेताना दिसली. पारंपरिक लुकमधील काजोलचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या