Kal Ho Naa Ho Re-Release: बॉलीवूडचा किंग खान याचे लाखो चाहते आहेत. शाहरुखचा प्रत्येक चित्रपट चाहते डोक्यावर उचलून घेतात. शाहरुखने गेल्या काही वर्षांत बॉलीवूडला एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यात अॅक्शन आणि थ्रिलर चित्रपटांसह अनेक कॉमेडी आणि रोमँटिक चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळाली आहे. अशात काही दिवसांपासून टॉलीवूडसह बॉलीवूडमध्येदेखील ९० च्या काळात प्रदर्शित झालेले चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित केले जात आहेत. त्यामध्ये शाहरुखचा प्रचंड गाजलेला एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

साल २००३ मध्ये ‘कल हो ना हो’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात शाहरुख खान, प्रीती झिंटा व सैफ अली खान अशी तगडी स्टारकास्ट होती. त्या काळी हा चित्रपट इतका गाजला की, ८६० दशलक्षांची कमाई ‘कल हो ना हो’ने केली होती. त्यामुळे आता निर्मात्यांनी पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
aamir khan, shah rukh khan, salman khan
सलमान खान आणि शाहरुख खानबरोबर एकत्र काम करण्याच्या चर्चांवर आमिर खानची प्रतिक्रिया; म्हणाला, “आशा आहे लवकरच…”
Shahrukh Khan
अभिजीत भट्टाचार्य यांनी शाहरुख खानच्या चित्रपटात गाणे बंद का केले? गायक खुलासा करत म्हणाले, “जेव्हा स्वाभिमान…”
kal ho na ho re release collection
२१ वर्षांनंतरही ‘कल हो ना हो’ ची जादू कायम, सिनेमा पुन:प्रदर्शित झाल्यावर केली तब्बल ‘इतक्या’ कोटींची कमाई
albanian singer Dua Lipa why she included Levitating x Shah Rukh Khan mashup in her Mumbai live concert
Video: दुआ लिपा लाइव्ह कॉन्सर्टमध्ये शाहरुख खानच्या गाण्यावर का थिरकली? कारण सांगत म्हणाली…
diljit dosanj shahrukh khan kkr 1
Video : दिलजीत दोसांझ भर कॉन्सर्टमध्ये बोलला असं काही की…; शाहरुख खान प्रतिक्रिया देत म्हणाला, “पाजी तू तर…”
Albanian singer dua lipa surprises shahrukha khan fans at Mumbai live concert
Video: दुआ लिपाने लाइव्ह कॉन्सर्टमध्ये शाहरुख खानच्या चाहत्यांना दिलं जबरदस्त सरप्राइज, सुहाना खान व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का?

केव्हा प्रदर्शित होणार?

‘कल हो ना हो’ चित्रपट याच महिन्यात १५ नोव्हेंबर रोजी म्हणजे अगदी उद्याच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. धर्मा प्रॉडक्शनच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाउंटवर याबाबत एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यामध्ये “लाल अब सबके दिल का हाल है, होनेवाला अब कमाल है! ‘कल हो ना हो’,” अशी कॅप्शन पोस्टला देण्यात आली आहे.

पोस्टर आल्यानंतर सर्व चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. एका युजरने यावर कमेंटमध्ये लिहिले, “शेवटी माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक चित्रपट आता पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर येणार आहे.” तर आणखी एकाने, “कल हो ना हो हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार हे ऐकून मला फार आनंद झाला. माझा आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे,” अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा : रणवीर सिंहला ऑफिसमध्ये ३ तास वाट का पाहायला लावली? मुकेश खन्ना म्हणाले, “मी त्याला थांबायला भाग…”

नैना आणि अमनची लव्ह स्टोरी

‘कल हो ना हो’ चित्रपटात शाहरुख खान, प्रीती झिंटा व सैफ अली खान मुख्य भूमिकांत आहेत. त्यात शाहरुखने अमनची भूमिका साकारली आहे; तर प्रीतीने नैना हे पात्र साकारले आहे. तसेच सैफने या चित्रपटात रोहित नावाचे पात्र साकारले आहे. या चित्रपटामध्ये अमन आणि नैना दोघांची प्रेमकहाणी पाहायला मिळते; मात्र हे प्रेम अर्धवट राहते. त्यात सैफनेदेखील दमदार अभिनय केला आहे.

Story img Loader