‘द केरला स्टोरी’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’नंतर या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा ‘द केरला स्टोरी’ हा दुसरा चित्रपट ठरला आहे. अवघ्या १८ दिवसांमध्ये या चित्रपटाने २०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला, परंतु दुसरीकडे या चित्रपटावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अनेक विरोधी पक्षांनी या चित्रपटाला प्रोपगंडा फिल्म असे म्हटले आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तमिळ सुपरस्टार कमल हासन यांनीही या चित्रपटाला लक्ष्य करत आपले रोखठोक मत मांडले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ‘आदिपुरुष’ चित्रपटातील ‘जानकी’च्या भूमिकेबद्दल अभिनेत्री क्रिती सेनॉन म्हणाली, “कारकिर्दीत सहसा…”

‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत कमल हासन म्हणाले की, “मी तुम्हाला सांगितले होते हा प्रोपगंडा चित्रपट आहे आणि मी याच्या विरोधात आहे. केवळ चित्रपटाच्या लोगोवर किंवा पोस्टरच्या खाली सत्यघटनेवर आधारित असे लिहून उपयोग नाही. संबंधित घटना प्रत्यक्षात सुद्धा खरी असावी लागते.” अभिनयासोबत कमल हासन राजकारणातही सक्रिय असतात. गेल्यावर्षी त्यांचा लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘विक्रम’ चित्रपट सुपरहिट ठरला होता.

हेही वाचा : Video : विराटची बुद्धिमत्ता पाहून अनुष्का झाली थक्क! पत्नीला बिझनेसची ऑफर देत कोहली म्हणाला, “कभी धोखा नहीं दूंगा…”

काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनीही ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाबाबत “संवेदनशील विषयांवर चित्रपट बनले पाहिजेत, पण ते संवेदनशील पद्धतीने बनवले पाहिजेत. निवडणुकांच्या काळात धर्मांतरावर आधारित चित्रपट का आला? अशा पद्धतीने निवडणुकांच्या काळात चित्रपट रिलीज करणे ही वेळ संशयास्पद वाटते.” असे रोखठोक मत मांडले होते.

हेही वाचा : वैभवी उपाध्यायच्या निधनानंतर होणाऱ्या पतीने केली भावुक पोस्ट; म्हणाला, “RIP मेरी गुंडी…”

दरम्यान, ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाबाबत सांगायचे झाले तर, हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचे कसे धर्मांतर करण्यात आले या कथेवर हा संपूर्ण चित्रपट आधारलेला आहे, असा दावा निर्मात्यांनी केला होता. त्यामुळे अनेक भागांत चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती, तर याउलट काही भागांत हा चित्रपट टॅक्स-फ्री करण्यात आला होता. ५ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ८ मे रोजी बंदी घातली होती. यावर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, अनुराग कश्यप, अभिनेत्री कंगना रणौतने या चित्रपटाचे समर्थन केले होते, तर काहींनी विरोध दर्शवला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamal haasan calls the kerala story propaganda film says i am against propaganda sva 00
First published on: 27-05-2023 at 18:25 IST