Kamal Haasan Highest Paid Actor India : दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील कलाकार, दिग्दर्शक हे त्यांचा वेगळ्या धाटणीचा विषय आणि मांडणी यांसाठी ओळखले जातात. बॉलीवूडप्रमाणे त्यांचे चित्रपटही कोट्यवधींच्या बजेटमध्ये बनवले जातात. तर तेथील कलाकारही त्यासाठी कोट्यवधींमध्ये मानधन घेतात. पण, एका दाक्षिणात्य अभिनेत्यानं फक्त २० दिवसांसाठी कोट्यवधीचं मानधन घेतलं होतं आणि ते देशातील सर्वाधिक मानधन घेणार कलाकार ठरले.
नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटात प्रभास, दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन यांसारखे लोकप्रिय कलाकार झळकले होते. अमिताभ बच्चन यांच्या कामाचं अनेकांनी कौतुक केलं. पण, यातीलच अजून एका अभिनेत्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आणि ते अभिनेते आहेत कमल हासन. कमल हासन यांनी यामध्ये यासकीन हे पात्र साकारलेलं. २०२४ मधील हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता. चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केलेली. पण, तुम्हाला माहीत आहे का एकट्या कमल हासन यांनीच या चित्रपटासाठी कोट्यवधींचं मानधन घेतलं.
कमल हासन यांनी घेतले तब्बल ‘इतके’ कोटी
‘इंडियाग्लिट्झ’शी संवाद साधताना फिल्ममेकर व अभिनेते योगी सेथु म्हणाले, “कमलसरांना २० दिवसांसाठी १५० कोटी रुपये देण्यात आलेले. मी त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हटलेलं की, तुम्ही देशातील सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार आहात, जे दिवसाला एक कोटी रुपये घेत होते.” सेथु यांनी पुढे सांगितलं की, कमल हासन यांनी कल्की या चित्रपटाच्या निर्मात्यांशी त्याची भेट घडवून दिली. तेव्हा सेथु यांनी कमल हासन यांना सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार बनवल्यानिमित्त निर्मात्यांचे आभार मानले होते, असं म्हटलं. त्यावेळी निर्माते सेथु यांना कमल यांनी २० नाही, तर फक्त १० दिवस दिले होते शूटिंगसाठी, असं सांगितलं. त्यावर सेथु म्हणाले की, मग तर तो दिवसाला दोन कोटी घेतो.
‘कल्की’ चित्रपटात कमल यांनी यासकीन हे पात्र साकारलेलं. हे पात्र ‘कॉम्प्लेक्स’ नावाच्या एका दुष्ट, हुकूमशाही सत्तेखालील जगावर राज्य करणारा सर्वेसर्वा देव-राजा म्हणून दाखवण्यात आला आहे. चित्रपटात त्यांचा स्क्रीन टाइम मर्यादित असला तरी कथानकात त्यांच्या पात्राला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. चित्रपटाच्या शेवटी दिलेल्या संकेतांवरून पुढील भागात त्यांच्या भूमिकेचा आवाका आणखी मोठा असणार असल्याचे स्पष्ट होते.
‘कल्की’च्या सीक्वेलवर काम आधीच सुरू झालं आहे. अमिताभ बच्चन, कमल हासन यांच्याबरोबरचे सेटवरील काही फोटो शेअर केले असून, बर्याच वर्षांनंतर दोघे एकत्र काम करत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. त्याशिवाय, कमल हासन लवकरच रजनीकांत यांच्यासोबतही एका नव्या चित्रपटात झळकणार आहेत, अशी माहिती आहे.
