कंगना रणौत व्यावसायिक निशांत पिट्टीला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. कंगना व निशांतचे अयोध्येतील राम मंदिरातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यानंतर या चर्चा होऊ लागल्या. पण अभिनेत्रीने या अफवा असल्याचं स्पष्ट केलंय. तसेच ती कुणालातरी डेट करतेय, पण तो निशांत नाही असा खुलासा तिने केला.

निशांत पिट्टीबरोबर कंगनाचं अफेअर असल्याचा दावा करणाऱ्या मीडिया रिपोर्टचा स्क्रीनशॉट शेअर करत कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलं, “माझी मीडियाला नम्र विनंती आहे, कृपया चुकीची माहिती पसरवू नका. निशांतजी विवाहित आहेत आणि मी दुसऱ्या कोणाला तरी डेट करत आहे. योग्य वेळ आल्यावर मी त्याबद्दल सांगेन. एका महिलेने एखाद्या पुरुषाबरोबर फोटो काढल्याने रोज तिचं नाव एखाद्या नवीन पुरुषाशी जोडणं योग्य नाही.”

randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”
friend request natak review
नाटयरंग : ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ – घटस्फोटित बाप-मुलीच्या नात्यातील उत्कट तेढ
Prithviraj Sukumaran on mother Mallika life
“तिचं पहिलं लग्न अपयशी ठरलं अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्याचं आईच्या घटस्फोटाबद्दल विधान; म्हणाला, “तिची बाजू…”
Budaun murder
“चकमकीत ठार झाला हे योग्यच झालं”, दोन मुलांची गळा चिरून हत्या करणाऱ्या साजिदच्या आईची उद्विग्न प्रतिक्रिया

“माझा व काजोलचा किसिंग सीन मी पत्नी अन् मुलीबरोबर पाहिला”, अभिनेत्याचा खुलासा; त्यांची प्रतिक्रिया सांगत म्हणाला…

kangana ranaut confirms dating news
कंगना रणौतची स्टोरी

कंगनाचे निशांतबरोबरचे फोटो समोर आल्यानंतर त्यांनी राम मंदिराला एकत्र भेट दिल्याचं म्हटलं होतं. सोमवारी (२२ जानेवारी) उद्घाटनाच्या दिवशी दोघांनी मंदिराला भेट दिली आणि नंतर त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. ते फोटो व्हायरल झाल्यानंतर दोघांबद्दल चर्चा सुरू झाल्या, पण या फक्त अफवा असल्याचं कंगनाने स्पष्ट केलं.

‘सीता और गीता’मधील ‘ती’ हेमा मालिनी नव्हेच! रोहित शेट्टीने केला गौप्यस्फोट, म्हणाला, “पंख्यावर बसलेली दिसतेय ती…”

कोण आहे निशांत पिट्टी?

निशांत पिट्टी ‘इझी माय ट्रिप’ या ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मचा सह-संस्थापक आहे. फॉर्च्यून इंडियाच्या अंडर ४० च्या यादीत त्याचे नाव होते. भारतातील सर्वात लोकप्रिय विमान प्रवास बुकिंग वेबसाइट तो चालवतो. तसेच तो ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाचा सह-निर्माता होता.