scorecardresearch

“इथे कलाकारांची हत्याही केली जाते”; घराणेशाहीच्या मुद्द्यावरून कंगणा राणौत भडकली, म्हणाली, “गँग करुन…”

प्रियांका चोप्राने बॉलिवूडमध्ये तिच्याबरोबर होत असलेल्या राजकारणाबाबत भाष्य करत सर्वांना धक्का दिला आहे. त्यानंतर आता कंगना राणौतने पुन्हा एकदा बॉलिवूडमधील घराणेशाहीवर टीका केली आहे.

sanjay raut
आहे घराणेशाहीच्या मुद्द्यावर कंगणा राणौतचे भाष्य

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली आणि ती सध्या हॉलिवूडमध्ये काम करत आहे. नुकतंच तिने बॉलिवूडमधील राजकारणावर भाष्य केल्याने ती चर्चेत आली. या राजकारणाला कंटाळूनच तिने हा निर्णय घेतल्याचं तिने डेक्स शेफर्डचा पॉडकास्ट या शोमध्ये खुलासा केला. याबाबत आता कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन कंगना राणौतने भाष्य करत प्रियांकाला पाठिंबा दिला आहे. बॉलिवूडमधील घराणेशाहीवर कंगनाने निशाणा साधला आहे. कंगनाने याबाबत ट्वीटही केले आहे.

हेही वाचा- नवाजुद्दीन म्हणतो ‘घटस्फोट झालाय’, पत्नी म्हणते ‘नाही झाला’, दोघेही मुलांच्या कस्टडीसाठी कोर्टात भिडणार

ट्वीटमध्ये कंगनाने म्हणलं आहे. “खरं आहे. सगळे चूकीच्या, अपरिपक्व लोकांपुढे वाकतात. त्यामुळे अशा व्यक्ती गॅंग तयार करुन दादागिरी करतात आणि इतरांना त्रास देतात. एवढंच नाही यशस्वी लोकांचा ते जीवही घेतात. एमेडियस हा चित्रपट घराणेशाहीवर भाष्य करतो. हा माझा आवडता चित्रपट आहे. कंगना म्हणाली.

या अगोदरही कंगनाने प्रियांका चोप्राच्या बॉलिवूड सोडून जाण्यामागे चित्रपट निर्माता करण जोहरला जबाबदार धरले आहे. याबाबत कंगनाने ट्वीट करत करणवर निशाणा साधला आहे. कंगना रणौतने ट्विटरच्या माध्यमातून करण जोहरवर गंभीर आरोप केले आहेत. करण जोहरने प्रियांका चोप्रावर बॉलिवूडमध्ये बंदी घातली होती. त्यामुळेच तिला भारत सोडून जावं लागलं असा दावा कंगनाने केला आहे.

काय म्हणाली होती प्रियांका

अलीकडेच प्रियांकाने एका मुलाखतीत कोणाचेही नाव न घेता सांगितले होते की तिला बॉलिवूडमध्ये कॉर्नर केलं जात होतं. चित्रपटांमध्ये घेतलं जात नव्हतं, मला खूप जणांकडून तक्रारी होत्या. मला इंडस्ट्रीत गेम खेळता येत नाही, इथल्या राजकारणाला मी कंटाळले होते आणि मला ब्रेक हवा होता असं प्रियांका म्हणाली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 12:19 IST

संबंधित बातम्या