बॉलीवू़डची क्वीन कंगना तिच्या अभिनयासह स्पष्टवक्तेपणामुळे सतत चर्चेत असते. तिचे मत ती नेहमी स्पष्टपणे मांडते. नेपोटिझम, फेमिनिझम या सगळ्यांवरही ती भाष्य करताना दिसते. अशातच कंगनाने अभिनेत्री ट्विंकल खन्नाला नुकतेच खडेबोल सुनावले आहेत.

अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना हिचा जुना व्हिडीओ कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. त्यात ट्विंकल खन्नाने फेमिनिस्ट असल्याचा दावा करीत पुरुषांची तुलना प्लास्टिक बॅगबरोबर केली आहे. कंगनाला ही गोष्ट पटली नसून, तिने स्टोरीद्वारे यावर आपला राग व्यक्त केला आहे.

हेही वाचा… आलिया भट्ट लेक राहासाठी रोज लिहिते ई-मेल; रणबीर कपूरने केला खुलासा, म्हणाला…

एका जुन्या मुलाखतीत ट्विंकलला विचारण्यात आले होते की, ती फेमिनिस्ट आहे हे तिला कसे समजले? त्यावर मजेशीर उत्तर देत ट्विंकल म्हणाली होती की, तिची आई, ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी तिला तिच्या लहानपणापासून शिकवले की, स्त्रियांना पुरुषांची गरज नसते.

पुढे ट्विंकल म्हणाली, “मी आणि आई कधी फेमिनिझम, समानता अशा गोष्टींवर बोललो नाही; परंतु आम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी पुरुषाची गरज नाही हे अगदी स्पष्ट होतं. एका छान हॅण्डबॅगप्रमाणे पुरुष आपल्याबरोबर असणं ही एक छान गोष्ट आहे; पण तुमच्याकडे हॅण्डबॅग नसली आणि प्लास्टिकची पिशवी असली तरी तुम्ही त्यात समधानी असता.”

हेही वाचा… “माझे अपहरण तुमच्या भक्तांनी…”, पाच वर्षांनी विक्रांत मेस्सीने ‘त्या’ पोस्टबद्दल मागितली माफी; म्हणाला, “हिंदू समुदायाला…”

ट्विंकलचे हे विधान कंगनाला खटकले आणि कंगनाने तिची मुलाखत इन्स्टाग्राम स्टोरीवर रिपोस्ट केली व त्याला कॅप्शन दिले. “तुम्हाला जनतेसमोर कूल बनायचं आहे का? म्हणून तुम्ही पुरुषांना प्लास्टिकची बॅग म्हणता आहात. चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या नेपो किड्सला सोन्याच्या थाळीत फिल्मी करिअर मिळालं; मात्र त्यांना ते फारसं झेपलं नाही,” अशा शब्दांत कंगनाने नाराजी व्यक्त केली.

कंगनाची स्टोरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून, त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. परंतु, ट्विंकलने अद्यापही यावर तिची प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, ट्विंकलबद्दल सांगायचे झाल्यास तिने सध्या अभिनय क्षेत्रातून विश्रांती घेतली आहे. आता ट्विंकल लेखिका म्हणून सगळ्यांसमोर आली आहे आणि गेल्या वर्षी तिने ‘वेलकम टू पॅराडाइज’ हे पुस्तक लाँच केले.