scorecardresearch

“…तर घरात घुसून मारेन,” कंगना रणौतने व्यक्त केला संताप, नेमकं प्रकरण काय?

आता पुन्हा एकदा कंगना तिच्या नवीन पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

kangana

अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच तिची बेधडक वृत्ती आणि स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते. समाजातील तिला न आवडणाऱ्या, न पटणाऱ्या गोष्टींबद्दल ती बिनधास्तपणे सोशल मीडियावरून तिची मतं मांडत असते. नुकताच तिने पुन्हा एकदा बॉलिवूडमधील घराणेशाहीवर निशाणा साधला होता. तर त्या पाठोपाठ आता तिने एक लांबलचक पोस्ट शेअर करत पुन्हा तिचा राग व्यक्त केला आहे.

कंगनाने बॉलिवूड माफियांवर निशाणा साधत एक लांबलचक पोस्ट शेअर केली. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर करत तिने लिहिलं, “ज्यांना माझी खूप काळजी वाटते त्यांना मी सांगू इच्छिते की, काल रात्रीपासून माझ्या घराच्या आजूबाजूला कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळून आल्या नाहीत. कॅमेरा घेऊन किंवा कॅमेऱ्याशिवाय कोणीही माझा पाठलाग केलेला नाही.”

आणखी वाचा : ‘इमर्जन्सी’ चित्रपट बनवण्यासाठी कंगना रणौतने गहाण ठेवली तिची संपूर्ण मालमत्ता, म्हणाली, “माझ्या मालकीची…”

पुढे ती म्हणाली, “चंगू मंगू गॅंगसाठी माझा संदेश आहे – मुलांनो, तुम्ही कोणत्याही अडाणीशी वैर घेतलेलं नाही. तुम्ही आत्ताच सुधारा नाहीतर मी घरात घुसून मारेन आणि ज्यांना मी वेडी वाटते त्यांना माहितीच आहे की मी वेडी आहे, पण मी किती वेडी आहे हे तुम्हाला माहित नाही.”

हेही वाचा : क्वीन इज बॅक! कंगना रणौतला परत मिळालं तिचं ट्विटर अकाउंट, पहिलं ट्वीट करत म्हणाली…

कालच तिने तिच्या व्हॉट्सअॅप डेटापासून प्रोफेशनल आणि पर्सनल माहिती लीक केली जात असल्याचा नेपो माफियांवर संशय घेतला होता. त्याचबरोबर “मी किंवा माझ्या टीमपैकी कोणी त्यांना एकही पैसा देत नाही. तर मग माझ्या प्रत्येक गोष्टीची खबर ठेवण्यासाठी यांना पैसा कोण पुरवत आहे?” असा प्रश्नही विचारला होता. तर आता पुन्हा एकदा कंगना तिच्या नवीन पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 14:30 IST
ताज्या बातम्या