Kangana Ranaut Naseeruddin Shah Controversy: बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौत यांनी ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यावर गंभीर शब्दांत टीका केली आहे. झारखंडमध्ये पेपरफुटी प्रकरणाच्या विरोधात आंदोलन सुरू आहे, मात्र यावर अनेक कलाकार प्रतिक्रिया देत नसल्याचे दिसून आले. दिल्लीमध्ये झालेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया न देणाऱ्या कलाकारांवर नसीरुद्दीन शाह यांनी निशाणा साधला होता. पण, आता झारखंडमधील आंदोलनावर नसीरुद्दीन स्वतः प्रतिक्रिया देत नसल्याने त्यांच्यावर अभिनेते पीयूष मिश्रा यांनी त्यांना घेरले आहे. पीयूष मिश्रांच्या कमेंटवर कंगना रणौत यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

कंगना रणौत यांनी पीयूष मिश्रांनी दिलेल्या प्रतिक्रियेची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करीत नसीरुद्दीन शाह यांच्यावर टीका केली आहे. कंगना रणौत यांनी लिहिलं, “खरंतर प्रत्येक जण कोणाचे ना कोणाचे श्वान आहे ही गोष्ट खरी आहे. मला या गोष्टीचा गर्व आहे की मी ज्या देशामध्ये कमावते (भाकरी खाते), त्याच देशाची बाजू घेते आणि त्याच देशासाठी लढते. पण नसीर साहेब, हे आपल्या देशात कमावतात पण शेजारसाठी भांडतात.”

नसीरुद्दीन यांच्यासारखा कोल्हा होण्यापेक्षा… – कंगना

पुढे त्यांनी लिहिलं, “आजकाल एखाद्याला श्वान म्हणणं हे तर त्याचं कौतुकच आहे. कारण एखाद्यामध्ये निष्ठा आणि सुंदरता सापडणं खूप अवघड झालं आहे. नसीरुद्दीन यांच्यासारखा कोल्हा होण्यापेक्षा मला श्वान होणं जास्त आवडेल.”

कंगना रणौत यांची पोस्ट

काय म्हणाले पीयूष शर्मा?

पीयूष शर्मा यांनी झारखंडच्या आंदोलनावरून नसीरुद्दीन शाह यांच्यावर टीका केली. पीयूष म्हणाले, “नसीर साहेब, तुम्ही CJP आंदोलनावेळी ज्यांनी प्रतिक्रिया दिली नाही त्यांना श्वान म्हणाले होते. तुम्ही म्हणालेले, ‘ज्या श्वानांच्या तोंडामध्ये हाड आहे, ते तर काहीच बोलणार नाहीत,’ पण माफ करा आणि आता मला तुम्हाला विचारायचंय, या क्षणाला आता कोण श्वान आहे? ज्यांच्या तोंडामध्ये हाड आहे आणि जे झारखंड पेपरलीकवर कोणतीही प्रतिक्रिया न देता गप्प बसून राहिले आहेत.”

JPSC आंदोलनामध्ये विद्यार्थी उतरले रस्त्यावर

दरम्यान, झारखंडमध्ये लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील कथित घोटाळ्यांवरून आंदोलन सुरू आहे. विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून परीक्षेचा निकाल आणि पद्धतीमध्ये सुधारणा करण्याची मागणी करत आहेत. दिल्लीच्या यशस्वी आंदोलनानंतर आता झारखंडमध्ये आंदोलन सुरू झाले असून काही कलाकरांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. लोकप्रिय अभिनेते व गायक पीयूष मिश्रा हे या JPSC आंदोलनामध्ये सहभागी झाले असून त्यांनी नसीरुद्दीन शाह यांच्यावर टीका केली आहे.