बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच तिच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अनेकदा ती असं काहीतरी बोलून जाते ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चा होताना दिसतात. आता कंगनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. ज्याची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे. एवढंच नाही तर या पोस्टमधून तिने बॉलिवूडच्या घराणेशाहीवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कंगनाने लिहिलं, “मी जिथे कुठे जाते, तिथे माझा पाठलाग केला जातो. रस्त्यापासून माझ्या घराच्या पार्किंगपर्यंत माझी हेरगिरी करण्यासाठी लोक झूम लेन्स लावतात. इथे सर्वांनाच माहीत आहे की, पापाराजी बॉलिवूड कलाकारांकडे तेव्हाच जातात, जेव्हा त्यांना त्या कामाचा पैसा मिळतो. पण जर मी किंवा माझ्या टीमपैकी कोणी त्यांना एकही पैसा देत नाही. तर मग माझ्या प्रत्येक गोष्टीची खबर ठेवण्यासाठी यांना पैसा कोण पुरवत आहे? सकाळी ६.३० वाजता माझे फोटो क्लिक केले गेले. मला माहीत नाही त्यांना माझी सर्व कोण देत आहे.”

Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
newly wedded wife calls her husband aho viral video
बायकोची ‘ती’ हाक ऐकताच लाजली ‘अहों’ची स्वारी! सासरची मंडळीही खुदकन हसली; पाहा Video
insta facebook shaheed word ban
इन्स्टाग्राम, फेसबुकवर शहीद शब्द लिहिण्यावर बंदी? का झाला असा निर्णय?
youth was kidnapped
खळबळजनक..! मृतदेहाची इन्स्टाला स्टोरी (स्टेटस) ठेवली; ‘त्या’ तरुणाची अपहरण करून केली हत्या

आणखी वाचा- कंगना रणौतने केलेला उर्मिला मातोंडकरचा ‘सॉफ्ट पॉर्न अभिनेत्री’ म्हणून उल्लेख; नेमकं काय आहे प्रकरण?

kangana ranaut instagram 1

कंगनाने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं, “या सगळ्याच्या मागे इंडस्ट्रीतील नेपो माफिया असू शकतात. मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या व्हॉट्सअॅप डेटापासून ते प्रोफेशनल आणि पर्सनल माहिती लीक केली जात आहे. आता हे माफिया माझ्या घरापर्यंत पोहोचले आहेत. ही तिच व्यक्ती आहे ज्याने आपल्या पत्नीला निर्माती होण्यास भाग पाडलं आणि स्त्रीप्रधान भूमिका साकारण्यास सांगितलं. ती माझ्यासारखेच कपडे परिधान करते, माझ्यासारखंच घराचं इंटिरियर डिझाइन बनवून घेते. एवढंच नाही तर तिने माझ्या हेअर स्टायलिस्ट आणि होम स्टायलिस्टलाही बोलवून घेतलं आणि नंतर त्यांनी माझ्याबरोबर काम करण्यास नकार दिला.”

आणखी वाचा- ‘पठाण’चे गुणगान गाणाऱ्या बॉलिवूडवर कंगना रणौत भडकली; ट्वीटमध्ये म्हणाली, “राजकारणापासून…”

कंगनाने इन्स्टाग्रामवर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने म्हटलंय, “तिने तिच्या लग्नात तशीच साडी परिधान केली होती. जशी मी माझ्या भावाच्या लग्नात रिसेप्शनसाठी परिधान केली होती. या सगळ्या गोष्टी खूपच विचित्र आहेत. पण माझे चांगले फिल्म कॉस्ट्यूम डिझायनर मित्र, ज्यांना मी खूप वर्षांपासून ओळखते. हे कपल त्यांच्याबरोबर काम करत आहे. माझे स्वतःचे फायनेन्सर्स आणि बिझनेस पार्टनर्स अखेरच्या क्षणी काहीच कारण न देता माझ्याबरोबर डील करण्यास नकार देतात. मला असं वाटतं की हे लोक मला मानसिक तणाव देण्याचा प्रयत्न करत आहेत. ते दोघंही एकाच बिल्डिंगमध्ये वेगवेगळे राहतात. तिने असं करणं बंद करायला हवं आणि त्याच्यावर लक्ष ठेवायला हवं. जर ती संकटात सापडली तर तिच्याबरोबर तिचं बाळही संकटात सापडेल. त्यामुळे माझा सल्ला आहे की तिने स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घ्यावी आणि तो काही चुकीचं करत नाहीये ना याची शहानिशा करावी. प्रिय मुली तुला खूप प्रेम आणि तुझ्या बाळालाही.”

kangana ranaut instagram 2

कंगनाच्या या स्टोरीवर चाहते आता प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. कंगनाने आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्याकडे इशारा केल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. आपल्या पोस्टमध्ये कंगनाने दावा केला आहे की रणबीर आणि आलिया एकाच बिल्डिंगमध्ये वेगवेगळे राहत आहेत. याशिवाय कंगनाने या दोघांवर इतरही आरोप केल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. दरम्यान आलियाने लग्नात नेसलेली साडी की कंगनाने भावाच्या लग्नाच्या रिसेप्शनला नेसलेल्या साडीसारखीच होती.