टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने २४ डिसेंबर रोजी मालिकेच्या सेटवर गळफास घेत जीवन संपवलं. तिच्या आत्महत्येप्रकरणी तिचा सहकलाकारा आणि बॉयफ्रेंड शिझान खान पोलीस कोठडीत आहे. तुनिषाच्या आईने शिझानवर तिचा छळ केल्याचे आणि रिलेशनशिपमध्ये असतानाही दुसऱ्या मुलींशी संबंध असल्याचे आरोप केले आहेत. तुनिषाच्या आत्महत्येनंतर टीव्हीसह बॉलिवूड कलाकारही प्रतिक्रिया देत आहेत. अशातच अभिनेत्री कंगना रणौतने तुनिषाच्या मृत्यू प्रकरणावर भाष्य केलंय.

अडीच वर्षे गप्प का? पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांची नावं काय? सुशांतच्या हत्येचा दावा करणाऱ्या रुग्णालय कर्मचाऱ्याची उडाली भंबेरी

Prime Minister Modi asserted that the gaming industry does not need regulation
‘गेमिंग उद्याोगा’ला नियमनाची गरज नाही! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; आघाडीच्या गेमर्सशी संवाद
Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
What Navneet Rana Said?
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, “मला माझी मुलं रोज विचारायची, आई…”
Narendra Modi at rbi event
“मी पुढचे १०० दिवस व्यस्त, मात्र शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी…”, रिझर्व्ह बँकेला पंतप्रधान मोदींचं मोठं आश्वासन

कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर लिहिलंय की, “एक स्त्री प्रेम, विवाह, नातेसंबंध किंवा अगदी आवडत्या व्यक्तीचं जाणं, या सर्व गोष्टींचा सामना करू शकते. पण तिच्या लव्ह स्टोरीमध्ये प्रेम नव्हतंच ही गोष्ट ती स्वीकारू शकत नाही. समोरच्या व्यक्तीसाठी तिचं प्रेम आणि असुरक्षितता हे तिचं शोषण करण्यासाठी पुरेसं होतं. तिचं प्रेम होतं, तर समोरच्याला (शिझान) फक्त तिचा शारीरिक आणि भावनिक वापर करायचा होता.”

कंगना रणौतने शेअर केलेल्या स्टोरीज…(फोटो – इन्स्टाग्रामवरून स्क्रिनशॉट)

कंगना पुढे म्हणाली, “अशा स्थितीत ती तिच्या स्वतःच्या आकलनशक्तीवर विश्वास ठेवू शकत नाही. तिने जर तिचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला असेल, तर ते तिने एकटीने केलेलं नाही, हा खून आहे.”

“तुनिषाचं निधन, शिझान कोठडीत अन् मालिकेचं शूटींग…”; FWICE अध्यक्ष म्हणाले “सेटवरील मजुरांचे फोन…”

“मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करते की, जसं द्रौपदीसाठी कृष्णाने, जसं रामांनी सीतेसाठी ठाम भूमिका घेतली, तशीच भूमिका घेत तुम्ही बहुपत्नीत्वाविरुद्ध कठोर कायदे कराल, अशी आम्हाला आशा आहे. संमतीविना नातेसंबंध, स्त्रियांवर होणारे अॅसिड हल्ले आणि महिलांचे तुकडे तुकडे करून हत्या करणाऱ्यांना कोणत्याही खटल्याशिवाय तात्काळ फाशीची शिक्षा द्या,” असं कंगना तिच्या पोस्टमध्ये म्हणाली आहे.

दरम्यान, तुनिषावर २७ डिसेंबर रोजी कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या मृत्यूप्रकरणी पोलीस तिचा बॉयफ्रेंड शिझान खानची चौकशी करत आहेत.