scorecardresearch

कंगना रणौत कुख्यात गँगस्टर अबू सालेमसह? व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ फोटोवर अभिनेत्रीची प्रतिक्रिया चर्चेत

कंगना कुख्यात गँगस्टर अबू सालेमबरोबर असल्याचं काहींनी म्हंटलं. यावरून कंगनाला चांगलंच ट्रोल केलं गेलं

kangana-abu-salem
फोटो : सोशल मीडिया

कंगना रणौत ही बॉलिवूडची एक लोकप्रिय अभिनेत्री आहे जी सतत काही ना काही कारणास्तव चर्चेत असते. चित्रपट असो किंवा राजकीय मत कंगना अगदी स्पष्टपणे सगळीकडे व्यक्त होते. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावरही ती चांगलीच सक्रिय असते आणि आपल्यावर टीका करणाऱ्या लोकांचा चांगला समाचार घेत असते. अशातच आता पुन्हा एका व्हायरल फोटोमुळे कंगना चर्चेत आली आहे.

कॉँग्रेस पार्टीच्या एका समर्थकाने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेयर करताना त्यात लिहिलं होतं “कंगना मियांबरोबर. यानंतर त ट्वीट केलेल्या फोटोवरुन चांगलंच वातावरण तापलं. कंगना कुख्यात गँगस्टर अबू सालेमबरोबर असल्याचं काहींनी म्हंटलं. यावरून कंगनाला चांगलंच ट्रोल केलं गेलं.

Ranbir Kapoor Not Summoned as Accused in Mahadev App Case
रणबीर कपूर आरोपी नाही, तर…; ईडीने अभिनेत्याला समन्स बजावल्याचं कारण समोर
Sukanya troll
“तिने जास्त दारू प्यायली आहे…,” डान्समुळे ट्रोल करणाऱ्याला सुकन्या मोनेंनी दिलं सडेतोड उत्तर, म्हणाल्या…
sheezan khan on iphone 15
“अ‍ॅपलने यांना iPhone 15 फुकट वाटले आहेत का?” पोस्ट करणाऱ्या सेलिब्रिटींना प्रसिद्ध अभिनेत्याचा प्रश्न
noida society fight viral video
कुत्र्याचे पोस्टर काढले म्हणून महिलेची पुरुषाला मारहाण, कॉलर पकडली, केस ओढले अन्…, VIDEO व्हायरल

आणखी वाचा : ९० च्या दशकातील ‘या’ सुपरहीट चित्रपटांचे येणार रिमेक; ‘या’ चित्रपटावर खुद्द रोहित शेट्टी करतोय काम

आता कंगनाने या फोटोमागील खरं सत्य उघडकीस आणत कॉँग्रेसला चांगलाच टोला लगावला आहे. या फोटोतील व्यक्ती अबू सालेम नसून ती नक्की कोण आहे याबद्दल खुलासा कंगनाने केला आहे. हे ट्वीट शेअर करत कंगना लिहिते, “मुंबईच्या एका बारमध्ये भेटलेली ही व्यक्ती अबू सालेम आहे असं खरंच या लोकांना वाटतंय का. ती व्यक्ती म्हणजे टाइम्स ऑफ इंडियाचे माजी संपादक मार्क मॅन्यूअल आहेत. ही लोक खरंच कार्टून आहेत, म्हणूनच यांच्या पक्षाची अशी अवस्था झाली आहे.”

कंगनाचं ही ट्वीट चांगलंच व्हायरल होत आहे. गँगस्टरला भेटण्याबद्दल ट्रोल करणाऱ्या लोकांना कंगनाने चांगलंच चोख उत्तर दिलं आहे. दरम्यान कंगना ‘चंद्रमुखी २’ या तमिळ चित्रपटात झळकली. याबरोबरच आता ‘तेजस’ आणि ‘इमर्जन्सि’ या आगामी चित्रपटातही कंगना प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kangana ranaut reacts to the viral photo of her with abu salem on social media avn

First published on: 01-10-2023 at 18:44 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×